पत्रकार नक्षलींचं पैदास केंद्र- मुंबई प्रेस क्लब
---- विनय जोशी
-मिडीया पकडलेला नक्षलवाद्यांना "विचारवंत-अॅक्टिविस्ट-मानवाधिकार कार्यकर्ते" म्हणुन का दाखवते आणि हिंदुत्ववादी विचारांची हेटाळणी मिडीयाच्या रक्तात का मुरली आहे याचा आढावा
सध्या आणि गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या तुरुंगात असलेला नक्षली कोबाड घंडी याची बायको अनुराधा घंडी काही वर्षांपूर्वी गेली. ती स्वतः हिंसक माओवाद्यांच्या सेन्ट्रल कमिटीची सदस्य होती. तिच्या स्मरणार्थ अनुराधा घंडी मेमोरियल कमिटी असा ट्रस्ट आहे. हा ट्रस्ट दरवर्षी "अनुराधा घंडी मेमोरियल लेक्चर" आयोजित करतो. २०१६ अमेरिकन निग्रो स्त्रीवादी अन्जेला डेविस या लेक्चरला येऊन भारतात दलित कसे असुरक्षित आहेत यावर भाषण मारून गेली.
२०१७ च्या नवव्या अनुराधा घंडी मेमोरियल लेक्चरला परवा अटक झालेला नक्षली वारा वारा राव आला होता. हे लेक्चर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित केलं होतं. लीगल राईट्स ऑब्सर्वेटरीने या लेक्चरला परवानगी देऊ नये अशी विनंती मुंबई पोलिसांना केल्यावर धावपळ उडाली. मग मुंबई मराठी पत्रकार संघाने मिडीयाला असा कोणताही कार्यक्रम आमच्या सभागृहात आयोजित केलेला नाही असं सांगायला सुरुवात केली. कारण हे लेक्चर पत्रकार संघातल्या नक्षल समर्थक लोकांच्या कृपेने तोंडी परवानगीने आयोजित केलेलं होतं.
बऱ्याच गोंधळानंतर सध्या न्यू इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार गुरबीर सिंग यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघाला कार्यक्रमाच्या परवानगीचं पत्र देण्यात आलं. आणि पत्रकार संघाने परवानगी देऊन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला स्टेजवर काही डावे पोपट वक्ते, समोर महाराष्ट्र सी.आय.डी., सेन्ट्रल एजन्सीजचे अधिकारी, मोजकेच श्रोते आणि अनेक रिकाम्या लाल खुर्च्या उपस्थित होत्या. संपूर्ण राष्ट्रीय मिडीयाने यावर रीपोर्ट छापले, "Ghandy Memorial Lecture concluded peacefully despite Right Wing group Legal Rights Observatory's threat to disrupt it!". म्हणजे स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्यांना "थ्रेट" आणि "लीगल नोटीस" यातला फरकही कळत नाही अशी स्थिती.
"पुरोगामी" महाराष्ट्राच्या राजधानीत झालेल्या आणि गेली ९ वर्षे होत असलेल्या या अनुराधा घंडी मेमोरियल लेक्चरला आलेला नक्षल नेता वारा वारा राव म्हणाला गेल्या ५० वर्षात नक्षलवादापेक्षा मलेरियाने जास्त माणसे मेली आहेत! याला सर्क्युलर लॉजिक म्हणतात. १९७५ च्या आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांचा आवडीचा युक्तिवाद असतो, "बाकी काही असो पण आणीबाणीमुळे देशात शिस्त आली!". यावर प्रसिद्ध कायदेपंडीत, भाजपा नेते अरुण जेटली यांनी सन २००० मध्ये इंडिया टुडेमध्ये लिहिलेल्या लेखात कॉंग्रेसला प्रश्न विचारला होता, "असं म्हणतात की प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म त्यांच्या आईवर झालेल्या बलात्कारातून झाला, म्हणुन काय उत्तम शास्त्रज्ञ जन्माला येण्याच्या अपेक्षेने आपण बलात्काराला कायदेशीर मान्यता द्यावी का?
नक्षलवाद आणि मलेरिया यांची तुलना ही याच प्रकारची आहे! पण हे डावे अत्यंत उर्मट आणि स्वतःला शहाणे समजणारे असतात, त्यांचासमोर बोलणार कोण?
तर अशा या नक्षलवादी कार्यक्रमाला परवानगी मागणारे श्रीमान गुरबीर सिंग, म्हणजेच कपिल सिब्बल यांचे माजी मेव्हणे! यांची मुंबईच्या पत्रकार वर्तुळात भूमिका काय तर हे पत्रकार कल्याणासाठी आपली ओळख आणि वट वापरून दर वर्षी लाखो रुपये जमवतात. गुरबीर सिंग स्वतः "पुरोगामी" आहेत, याचा अर्थ नक्षली हिंसा सरकारच्या फसलेल्या नीतीचा परिणाम आहे वगैरे वगैरे सिद्धांत मांडणारे आहेत.
गुरबीर सिंग यांनी जमवलेल्या प्रचंड पैश्यावर मुंबई प्रेस क्लब चालतो. तिथे अनेक "सोयी" आणि "सुविधा" पत्रकारांना पुरवल्या जातात. पत्रकारांचे "कल्याण" होते! पंचतारांकित मुंबई प्रेस क्लब मध्ये बसुन "विडंगारिष्ट", "कुटजारीष्ट" वगैरे विदेशातील रसशाळांमध्ये तयार केलेले भयंकर महागडे आयुर्वेदिक काढे पत्रकार बंधुंसाठी अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात. आणि असे काढे घेतल्यानंतर आमचे पत्रकार बंधु "समाजातील विषमता", "महाराष्ट्रातील दुष्काळ", "गरिबांच्या कल्याणाचे उपाय", "मोदीमुळे संविधानाला निर्माण झालेला धोका" यावर तासनतास विचारमंथन करतात. पत्रकार बंधू एवढ्या प्रतिकुल परिस्थितीत कंबर मोडेपर्यंत काम करतात म्हणुन देश चालतो!!!
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर असे अनेक लोक आहेत ज्यांनी जन्मात चार सलग आणि सुसंबंध ओळी लिहिल्या नाहीत. सध्याच्या कार्यकारिणीवर असेही महाभाग आहेत ज्यांच्या शेल कंपन्या आहेत, काळ्याचे गोरे करणे हाच त्यांचा मुख्य धंदा आहे आणि "पत्रकार" असणं ही त्यांची काळे धंदे लपवण्याची ढाल आहे. (याबद्दल आक्षेप असेल तर ते खटला भरू शकता- चुक असेल तर माफी मागु!)
प्रसन्न जोशी कॅप्टन स्मिता गायकवाडांवर आणि राजदीप सरदेसाई तुषार दामगुडे यांच्यावर नक्षल विषय आला की का किंचाळतात?
तर गुरबीर सिंग स्वतः टोकाच्या डाव्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांनी अपार मेहनतीने जमवलेला पैसा मुंबई प्रेस क्लबमध्ये अत्यंत उंची "विडंगारिष्ट", "कुटजारीष्ट" वगैरे भयंकर महागडे आयुर्वेदिक काढे खरेदी करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे प्रसन्न जोशी, राजदीप सरदेसाई, समर खडस, सुधाकर काशिद आणि अन्य अनेक पत्रकार बंधु त्यांचे "बडे भाईसाब" गुरबीर सिंग यांची मर्जी पलटेल असे वागत नाहीत.
गुरबीर सिंग यांच्या सारख्यांनी फेकलेल्या याच तुकड्यांवर पोसलेले पत्रकार, कोळसे पाटील यांनी भर टीव्ही स्टुडियोमध्ये समोरच्याला "ए कुत्र्या गप्प बस..." वगैरे म्हटले किंवा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तरी परत परत कोळसे पाटलांनाच बोलावतात. भर स्टुडियोत प्रकाश आंबेडकर पत्रकाराला म्हणाले, "तुझी ***** मारीन" तरी माना खाली खालुन गप्प बसतात... शामनाथ बाघेल या नक्षल विरोधी कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी नंदिनी सुंदरला राजदीप नक्षल एक्स्पर्ट म्हणून बोलावतो!
असा हा आपला लोकशाहीचा सडलेला, चौथा स्तंभ आहे (चौथा स्तंभ ही पदवी त्यांनी स्वतःच स्वतःला लाऊन घेतली आहे!), जो बाहेरून मोठ्या बाणेदारपणाचा आव आणतो पण प्रत्यक्षात यांना पाठीचा कणाच शिल्लक राहिलेला नाही!
हिंदुत्ववादी विचार राजकारणात प्रबळ झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे, संविधान धोक्यात आहे आणि भाजप-संघ विरोधी विचारांचा आवाज दाबत आहेत; असा आरोप करणारे हे पत्रकार त्यांच्या स्टुडीयोमध्ये आलेल्या विरोधी विचारांच्या लोकांचा आवाज कसा दाबतात, त्यांना बोलायची संधी कशी नाकारतात हे आपणं रोजंच बघत असतो. त्यामुळे त्यांनी केलेले सर्व आरोप आपली पापे लपवण्यासाठी आहेत अशी लोकांची भावना झाली आहे आणि याला, "उल्टा चोर, कोतवाल को डांटे!" असं म्हणतात!
एकीकडे आपण निर्भीड आणि स्वतंत्र पत्रकार असल्याचा आव आणुन प्रत्यक्षात राजकीय बाजु घेऊन बोलायचे हा यांचा धंदा आहे आणि त्यामुळे "नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा" ही म्हण अशा पत्रकारांना लागु पडते.
भाऊ तोरसेकरांसारखे लोक मिडीयाच्या मुख्य प्रवाहात का नाहीत, याचं उत्तरही यातंच लपलेलं आहे. भाऊ तोरसेकर यांच्यासारख्यांना गुरबीर सिंग प्रवृत्तीनी फेकलेले तुकडे मनापासून आवडत नाहीत, त्यामुळे मुख्य मेनस्ट्रीम मिडीया त्यांना पत्रकार मानत नाही!
हे सर्व वाचुन अनेकांची डोकी भडकतील, अनेक जन बदनामीच्या केसची धमकी देतील, अनेक जन चारीत्र्यहननाचा प्रयत्न म्हणुन लिहिणाऱ्याची निंदा करतील; पण हे सर्व प्रयत्न हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला मदत करतील. याविरुद्ध बोंब मारणे पत्रकारांच्या जराही हिताचे नाही (वाचा आणि गप्प बसा!), कारण पत्रकारांचा गलिच्छ व्यवहार लोकांसमोर रोज येत आहे. यच्चयावत सर्व पेपर्स आणि चॅनल्सनी परवा अटक केलेले नक्षली "विचारवंत-अॅक्टिविस्ट" म्हणुन जगासमोर मांडले. त्यामुळे "पत्रकारितेची" यांनी स्वतःच्या हातानेच "चिंधीकारीता" केली आहे. यांनी एकदा सोशल मिडीया बघितला म्हणजे त्यांच्याबद्दल सामान्य माणसाच्या भावना किती तीव्र आहेत ते त्यांना कळेल.
तसंही मिडीयाची मोनॉपॉली, मस्ती आणि एकंच विचारसरणी जगासमोर आणण्याची अव्यावसायिक वृत्ती सोशल मिडीयामुळे पुर्णपणे मोडुन पडली आहे. त्यामुळे पत्रकारांचे, हिंसक लोकांना "विचारवंत-अॅक्टिविस्ट--मानवाधिकार कार्यकर्ते" म्हणुन दाखवण्याचे; देशद्रोहाला महीमामंडीत करण्याचे आणि हिंदु चालीरीतींना "मागास" म्हणुन हिणवण्याचे धंदे यापुढे कोणीही खपवुन घेणार नाही.
खड्ड्यात गेलेली प्रतिष्ठा परत मिळवायची असेल, तर पत्रकारांनी देशभर पसरलेल्या "गुरबीर सिंग" प्रवृत्तीच्या लोकांच्या ओंजळीने पाणी पिणं बंद करावं आणि स्वतःच्या मेंदुने घटनांचं विश्लेषण करावं. हे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर गेलेली प्रतिष्ठा परत मिळेल.
या क्षेत्रात अजुनही अनेक जण मुल्ये आणि कोणतीही असली तर एक पक्की विचारधारा बाळगुन जन्मभर त्याच्याशी प्रामाणिक राहणारे पत्रकार आहेत. त्यांच्या भावना या लेखामुळे दुखावतील. अशा सर्व पत्रकार बांधवांची मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो.. पण हे कुणीतरी, कधीतरी समोर आणणं आवश्यक असल्याने लिहिलं आहे...
कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ आता अदृश्य झाला आहे....
No comments:
Post a Comment