Friday, August 24, 2018

आयर्लंडची कॅथोलिक बलात्कार गृहे आणि अर्भकांची सामुहिक दफनभूमी!

आयर्लंडची कॅथोलिक बलात्कार गृहे आणि अर्भकांची सामुहिक दफनभूमी!

-विनय जोशी 

पोपच्या दौऱ्याने कॅथोलिक चर्चच्या लैंगिक पापी इतिहासाला परत एकदा वाचा फुटली!

आयर्लंडच्या कॅथोलिक चर्चने महिला आणि मानवतेवर ज्या प्रकारे अत्याचार केले त्याला जगात तोड नाही. या सगळ्याच्या मुळाशी होत्या  "मॅग्दालीन लाउंड्रीज", ज्याच्या आड बंदिस्त महिलांवर अमानुष लैंगिक अत्याचार केले गेले आणि त्यांच्यापासुन झालेली तान्ही मुले बळजबरीने आईपासुन तोडुन अज्ञात लोकांना दत्तक दिली गेली. कॅथोलिक चर्चचा हा अमानुष धंदा कित्येक वर्ष बिनबोभाट चालु होता. पोपच्या आयर्लंड दौऱ्याच्या निमित्ताने त्याला परत एकदा वाचा फुटली आहे.

पोपच्या आगामी आयर्लंड दौऱ्याची तिकिटे/पासेस घेऊन तिथे नं जाता निषेध नोंदवण्याचे आंदोलन जोर पकडत आहे. कॅथोलिक चर्चने गेल्या शेकडो वर्षात आयरिश महिला आणि मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल लोकांच्या मनात तीव्र संताप आहे. १९९६ ला शेवटची  महिला "मॅग्दालीन लाउंड्रीज" मध्ये पाठवली गेली आणि त्यानंतर एका ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम करताना २०० अर्भकांचे मृतदेह पुरले गेल्यानंतर लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड संताप उफाळुन येऊन हे प्रकार बंद झाले. तरीही निर्लज्ज कॅथोलिक चर्चने आजपर्यंत "मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील एकाही पिडीत महिलेला नुकसानभरपाई दिलेली नाही! आणि याबद्दलच लोकांच्या मनात कॅथोलिक चर्च बद्दल संताप आणि राग आहे.

अठराव्या शतकात "चारित्र्यहीन" स्त्रियांना शिक्षा म्हणून यात आणुन कोंबायला सुरुवात केली गेली. "चारित्र्यहीन" महिला कोण हे चर्चचे पाद्री ठरवू लागले. जी सुंदर आणि भोगायला उत्तम ती "चारित्र्यहीन" ठरवली जाऊ लागली. एकदा तिच्यावर हा शिक्का पडला कि ती "मॅग्दालीन लाउंड्रीज" मध्ये आणुन टाकली जायची. आयर्लंडची न्यायालये सुद्धा लहान सहान गुन्ह्यासाठी महिलांना असल्या भयानक तुरुंगात पाठवु लागली.

विशेष म्हणजे धार्मिक गुप्ततेच्या नावाखाली आजपर्यंत एकूण किती महिला यात कोंबून ठेवल्या गेल्या, कितींवर बलात्कार झाले, किती अर्भके मेली आणि किती आपल्या आयांपासून वेगळी करून समाजात दत्तक दिली गेली याची कुठेही नोंद नाही! यातील महिलांना शिस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवसभर मौनात राहावे लागत होते! आपण कल्पनाच करू शकत नाही, की जी महिला बाह्य जगापासुन वेगळी केलेली आहे तिच्या वाट्याला काय काय आलं असेल आणि स्वतःचं तान्हं बाळ कुणी हिसकावून नेल्यावर बंदिस्त बाईच्या मनाचं काय झालं असेल!

पोपच्या या दौऱ्याच्या दिवशीच तुआम या ठिकाणी एका शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी एक कॅथोलिक माता आणि बालगृह होते आणि तिथेच ८०० अर्भकांचे पुरलेले मृतदेह मिळाले होते. अत्यंत किळस आणणारा प्रकार आहे हा सगळा!

"मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील महिलांना मोठ्या आंदोलनानंतर आयर्लंड सरकारने नुकसानभरपाई भरपाई दिली पण गेंड्याच्या कातडीचं आणि पैश्याच्या राशी असलेलं कॅथोलिक चर्च अजुनही या बाबतीत अजिबात कान हलवत नाही...

हे वाचुन यापुढे हिंदी सिनेमातल्या पांढरा डगळा घातलेल्या दयाळु-कनवाळु-मायाळु फादर किंवा सिस्टरच्या प्रतिमेवर ठेवाल विश्वास?

कॅथोलिक चर्च हे पाप, अत्याचार, गुन्हेगारी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, दमन, रक्तपात याचं सामनार्थी नाम आहे....

उघडा डोळे....

आणि लोकांचे उघडायला मदत करा....


No comments:


Add to Google