लोकसत्ता चे सध्याचे संपादक श्री.कुमार केतकर सध्या खुप वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत.नवीन संपादक म्हणून रुजु झालेल्या श्री.गिरीश कुबेर यांनी केतकरांवर निर्णायक वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे.केतकरांच्या लोकसत्तामधील एकछत्री साम्राज्याला कुबेरांनी एक्सप्रेस ग्रुपच्या व्यवस्थापनाच्या मदतीने जबरदस्त धक्का दिला आहे.परिणामस्वरुप,सध्या केतकर हे असहाय आणि अगतिक झाले आहेत.पण प्रश्ण उपस्थित होतो की,अशी परिस्थिती कुमार केतकरांवर का आली?याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला त्यांच्या लिखाणातुन मिळेल.
कुमार केतकर हे नाव मराठी पत्रकार जगतात पूर्वी खुप आदरानी घेतलं जायचं(याचा अर्थ आता त्यांची किम्मत शून्य झाली आहे असं नाही,पण त्यांच्याबद्दलचा आदर मात्र अजिबात शिल्लक राहिलेला नाही).हळुहळु केतकरांनी आपल्या व्यासंगी लिखाणाची दिशा बदलून ती असत्य,धादांत खोटं आणि विखारी टिकेच्या दिशेने वळवली.राष्ट्रवादी संघटना,हिंदुत्ववादी विचार यांना बलात्कार,चो-या आदी गुन्ह्यांपासून ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आतंकवादी घटनांपर्यंतच्या सगळ्या घटनांसाठी केतकर जबाबदार धरु लागले.कदाचित राष्ट्रवादी आणि हिंदुत्ववाद्यांना शिविगाळ करुन,त्यांना प्रत्येक वाईट कृत्यासाठी जबाबदार धरुन केतकर,राज्यसभेत आपली जागा पक्की करण्याची धडपड करत असावेत असा अंदाज काही जणांनी बांधला.तशा आशयाची बातमी एका हिंदी दैनिकाने छापली सुद्धा.ती बातमी वाचुन केतकरांचा ब-यापैकी पाराही चढला.पण आचरट आणि निराधार आरोपांनी त्यांची विश्वासार्हता पार धुळीस मिळाली.
७ ऑगस्ट २००९ मधे नवी मुंबईच्या एका सत्र न्यायालयात ऊर्दु वृत्तपत्राच्या एका संपादकाविरुद्ध धादांत खोटे आणि देशद्रोही आरोप करणारे लेख लिहील्याबद्दल खटला दाखल झाला,त्यानंतर लगेचंच लोकसत्तामधील कुमार केतकरांचे खासंखास श्री.समीर परांजपे यांच्याजवळ १६ ऑगस्ट २००९ ला,खास केतकरांसाठी "सावध रहा" असा निरोप देण्यात आला.त्यावेळी गुजरात भूकंपग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीसंदर्भात केतकरांनी केलेल्या बेछुट आरोपांबद्दल त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तयारी सुरु होती.तशा आषयाचा निरोप समीर परांजपेंच्या मार्फ़त केतकरांना देण्यात आला.शिवाय महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणांहून केतकरांच्या लेखांवर काळजीपूर्वक लक्ष ठेवलं जातंय हेही केतकरांना सूचित केलं गेलं.पण केतकर गाफ़ील राहिले(का समीर परांजपेंनी त्यांच्यापर्यंत ही सूचना पोहोचवली नाही हे माहीत नाही).केतकरांच्या सुदैवाने भुकंपग्रस्त निधीबद्दलचा लेख हा खुप जुना झाल्याने त्यावर खटला दाखल न करण्याचा निर्णय संबंधित व्यक्तींनी घेतला.पण बेछुट आणि निराधार आरोप हीच निर्भीड पत्रकारिता आहे,या भ्रमात वावरणारे केतकर,आपली स्वामीनिष्ठा(त्यांचे स्वामी कोण हे समजण्यासाठी त्यांचे लेख जिज्ञासूंनी प्रत्यक्ष वाचावेत) अधिकाधिक प्रकट करण्याच्या नादात आचरट आणि निराधार लेखनाचे कायदेशीर दुष्परिणाम किती घातक असू शकतात हे विसरले.आणि त्यांच्या हातुन २५ ऑक्टोबर २०१० चा "भगवे दहशतवादी" हा लेख लिहिला गेला.हा लेख वाचल्यावर केतकरांचं वय किती वाढलंय आणि त्याचे किती वाईट परिणाम त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीवर झाले आहेत याची जाणीव अनेक वाचकांना झाली.हा अग्रलेख केतकरांच्या कारकीर्दीतला सगळ्यात वाईट आणि आपत्तिजनक लेख होता असं म्हणावं लागेल.या लेखात सत्त्याचा दुरान्वयानेही संबंध असता कामा नये अशी काळजी घेतली होती.स्व.राजीव गांधींच्या मारेक-यांचा संबंध हिदुत्वाशी जोडण्यात आला होता,भारताच्या न्यायव्यवस्थेवर बेछुट आरोप करण्यात आले होते(ज्या आरोपांची योग्य दखल न्यायालयाने घेतल्यास केतकर अत्यंत गंभीर कायदेशीर संकटात सापडु शकतात).
यावेळी मात्र केतकरांचं दुर्दैव आड आलं.वृत्तपत्रांमधील आक्षेपार्ह लिखाण शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करणा-या ५-६ सक्रीय गटांपैकी मुंबईस्थित एका गटाच्या वाचनात हा लेख आला.आणि केतकरांवर न्यायालयीन कारवाई करण्याची तयारी सुर झाली. १५ दिवसाच्या कालावधीत कुमार केतकरांना दापोली(रत्नागिरी) येथील श्री.शिगवण,श्री.म्हादलेकर आणि श्री.आयरे यांनी ३ वेगवेगळ्या कायदेशीर नोटीसा पाठवल्या.या नोटीसा कुमार केतकरांचे मालक असलेल्या एक्सप्रेस ग्रुपच्या दिल्ली आणि मुंबईस्थित मुख्यालयांनाही पाठवण्यात आल्या.एक्सप्रेस ग्रुपने या नोटीसांची गांभि-याने दखल घेत कुमार केतकरांना बाजुला करुन ग्रुपची मान न्यायालयाच्या कचाट्यातून सोडवण्याची धावपण सुरु केली.आणिबाणीची उपाययोजना म्हणून व्यासंगी पत्रकार आणि लेखक श्री.गिरीश कुबेर यांना लोकसत्तेत पाचारण करण्यात आलं.केतकरांचे पंख पद्धतशीरपणे छाटण्यात आले.
अजुनही कुमार केतकर हे नाव लोकसत्तेत दिसत आहे,पण एक्सप्रेस ग्रुप त्यांना स्वत: जाण्यासाठी प्रवृत्त करत आहे-म्हणजे केतकरांनी स्वत: राजीनामा द्यावा अशी परिस्थिती निर्माण केली जात आहे.कुमार केतकरांवर आज जी वेळ लोकसत्तेत आली आहे त्याबद्दल फ़ार वाईट वाटतं,पण याला त्यांना नोटिस पाठवणा-या व्यक्ती जबाबदार नाहीत,तर बेछुट लिखाण करून करून राज्यसभेत जाण्याची केतकरांची अवाजवी लालसाच कारणीभूत आहे.पत्रकारितेत जहाल टिका केलेली वाचक सहन करतात पण निराधार आणि बेछूट लिखाण कोणीच सहन करू शकत नाही.आणि जेव्हा एखादा आरोप एखाद्या व्यक्ती अथवा संघटनेवर केला जातो तेव्हा तो सिद्ध करण्याएवढे सबळ पुरावे तुमच्याजवळ असलेच पाहिजेत असा सामान्य नियम आहे.ते जर नसतील तर तुम्हाला कायदेशीर कारवाई झेलावीच लागेल.
सन २०११ हे कायदेशीर कारवायांचे वर्ष आहे.यावर्षी वरुन स्वातंत्र्य,समता आणि बंधुता या त्रिसूत्रीचा जप करणा-या आणि आतुन "बरखा-राडीयागिरी" करणा-या,स्वैर,बेधुंद असणा-या प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांना त्यांच्या कृष्णकृत्त्यांची किंमत मोजावीच लागेल.
कुमार केतकरांचं जे काही व्यावसायिक नुकसान त्यांच्याविरुद्ध केलेल्या कायदेशीर कारवाईमुळे झालं असेल त्याबद्दल सगळ्यांनाच खेद वाटत आहे,पण या दुर्दशेला स्वत: केतकरंच जबाबदार आहेत हीच आमची स्पष्ट धारणा आहे.
अन्य पत्रकारांनीही ही बाब लक्षात ठेवावी की,आचरट लिखाण करताना व्यवस्थापन साथ देत असलं तरी न्यायालयीन लढाई ही त्या पत्रकाराला स्वत:च लढावी लागेल.कुमार केतकरांसारख्या बड्या हस्तीची ही अवस्था होत असेल तर अन्य पत्रकारांची काय स्थिती होईल याची कल्पनाच केलेली बरी!!!
4 comments:
I agree with the blog writer. Kumar had gone far too beyond and he was actually stretching it too far and unfortunately in this country, if a person who belongs to Hindu religion blames other Hindu Religion person then he is considered to be an "intellectual". Kumar got into this trap. About his aspirations to be a Rajya Sabha member are also well known and at a point in time he had also gone soft with SHivSena thinking that they will help him to be a MP. Anyway - a reader like me for instance had lost all the respect (whatever little was left) for Kumar long back.In fact for readers who keep a close record of India's contemporory politics may also remember that Kapil Sibbal at one point in time had queued up to get a ticket from BJP! he lost the chance to Arun Jetley and look at him today..... Sibbal is no inferior to a barking dog. Anyway - the intellectuals
बाप रे.. कुमार केतकर हे एवढे विकृत आणि मानसिक दृष्ट्या विकलांग असतील असे वाटले नव्हते. तुम्ही नवीनच परंतु तर्कशुद्ध माहिती समोर आणली आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी एवढ्या नीच पातळीला माणूस जाऊ शकतो! अरे मग खासदार होऊन काय दिवे लावणार तुम्ही? मडमेचे तळवे चाटण्याचा कोण हा लाचारपणा!
त्यांची हकालपट्टी होते आहे हे अत्यंत योग्यच आहे. लोकसत्तेवरचा काळा डाग पुसला जाईल. आम्ही समजत होतो ते निवृत्त होताहेत. हकालपट्टी होते आहे हे माहित नव्हते.
पुन्हा एकदा धन्यवाद ही बाजू प्रकाशात आणल्याबद्दल.
Kumar ketkar yanna MAFI naahi
mastach !! Ketkaranpasun dhada gheun express group ani itar patrakar yapudhe kalajipurvak khote aprop ani vishari lekh lihitil... . . .
Post a Comment