कायदेशीर नोटीस
१) मुग्धा कर्णिक- मुंबई,
२) संपादक- दै.दिव्य मराठी
विषय:- दि. १२ मार्च २०१७ च्या अंकातील लेखाबाबत कायदेशीर नोटीस देण्याबाबत..
महोदय/ महोदया,
दि. १२ मार्च २०१७ च्या दै. दिव्य मराठीच्या लेखात, गेल्या वर्षी इंग्रजी साप्ताहिक आउटलुक मध्ये नेहा दीक्षित यांनी केलेल्या संघ आणि समितीवरील खोट्या आणि द्वेषमुलक आरोपांचा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे. सदर आरोप करताना लेखिका मुग्धा कर्णिक अथवा संपादक यांनी कोणत्याही संघटनेच्या पदाधिकाऱ्याजवळ संपर्क साधून आरोपांची सत्यता पडताळण्याची तसदी घेतलेली दिसत नाही.
सदर लेखात करण्यात आलेले आरोप अत्यंत खोटे, खोडसाळ, अफवा पसरवणारे आणि पूर्वग्रह दुषित असे आहेत.
सदर लेखात करण्यात आलेल्या आरोपांबद्दल नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत सदर लेखाबद्दल बिनशर्त माफी नं मागितल्यास अथवा समाधानकारक पुरावे मला न दिल्यास मी, लेखिका म्हणून मुग्धा कर्णिक आणि दैनिकाचे संपादक यांच्याविरुद्ध रोन्ग्चू पोलीस ठाणे, गारो हिल्स- मेघालय येथे भारतीय दंड संहितेच्या कलम 505 (1)b, 505(1)c, 505(3), 599, Information Technology Act-2000 आणि अन्य कठोर कायद्याच्या तरतुदी अंतर्गत आपल्या विरोधात तक्रार दाखल करून कठोर कारवाईची प्रक्रिया सुरु करेन. आणि याशिवाय गरज भासल्यास माझ्या वकीलामार्फत मा. गुवाहाटी उच्च न्यायालयात आपणाविरोधात रीतसर खटला दाखल करेन.
अशा प्रकारच्या खटल्यामुळे आपल्या वैयक्तिक आर्थिक अथवा सामाजिक नुकसानीस मी जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घेण्यात यावी.
कळावे,
जे. एम. संगमा
रोन्ग्चू- गारो हिल्स,
मेघालय
No comments:
Post a Comment