Friday, August 31, 2018

Journalist Naxal Breeding Pond- Mumbai Press Club



Journalist Naxal Breeding Pond- Mumbai Press Club

Vinay Joshi

Why media portrays arrested Maoist terrorists as intellectuals-activists-human rights defenders and why they enjoy beating and insulting Hindu values?


Anuradha Ghandy, the wife of jailed Maoists leader Kobad Ghandy died about 10 years ago. The trust was formed in the name of "Anuradha Ghandy Memorial Committee" in Mumbai. It arranges Ghandy Memorial Lectures, in which black American feminists Angela Davis participated and had speech in 2016. In her speech he parroted prototype allegations that Dalits are crushed by Indian right wing government and much more!

Last year just arrested Naxal leader Vara Vara Rao delivered lecture. He pleaded that Malaria is more lethal than Maoist insurgency in terms of fatalities. I recalled Congress defense of 1975 Emergency imposed by Indiara Gandhi, in which Congress leaders used to claim, "National discipline was best outcome of emergency period!" Replying to this logic, veteran lawyer, BJP leader Arun Jeitley fired back in the year 2000 India Today special issue commemorating 25 years of black period, " There is common perception in Europe, that famous scientist Albert Einstein had been born out of rape, should We legitimize rape?" Vara Vara Rao's circular logic is of same genre.

In 2017 Legal Rights Observatory had strongly objected to Ghandy Memorial lecture which was to be held at Mumbai Marathi Patrakar Sangh hall. After media storm regarding LRO demand for ban on lecture, Patrakar Sangh denied lending venue to lecture, as it had approved verbal permission instead of written one. Then New Indian Express journalist Gurbir Sing, relative of Kapil Sibbal moved in and tendered written request for venue, which was granted by Patrakar Sangh.

The event was poor show in which few speakers on dais, Mumbai Police Special Branch spies, few people in audience and lot of red color empty chairs graced the function.
 Nationa media declared, "Ghandy Memorial lecture concluded peacefully despite threats from right wing groups!" What a joke! LRO had raised issue legally and never ever threatened to disrupt it physically. But media played with facts!

You would ask who is Gurbir Sing?
He is well established journalists in Mumbai. Have huge political clout. He raised millions of rupees per year for journalist welfare, where all rare and costly "Eatables" and "Drinkables" are made available to journalists at Mumbai Press Club! After having such a costly stuff there, our journalists used to churn out their thoughts and moorings on burning social issues like "Drought in Maharashtra", "Poverty eradication", "Modi's threat to Indian Constitution" and so on.

There are many guys on MMPS body who have never ever wrote single para on any issue, but they are occupying positions there only to use their Journo badge for safeguarding their shell companies involved in money laundering.

As a gratitude for their boss Gurbir Sing, Prasanna Joshi and Rajdeep Sardesai went to the extent of barking and hurling volleys at Captain Smita Gaekawad and Tushar Damgude during latest TV shows. That show of fraternity and compassion by Prasanna Joshi and Rajadeep was really fantastic and classic example of modern day slavery, both were screaming as of they are being arrested by Police for Naxal connections!

These so called journalists never tried to pull the strings of Kolse Patil who shouted "Shut up Dog" at Tushar Damgude in live TV show... When Kolse Patil hurled caste abuse at another!
Even the media fraternity never came overboard when Prakash Ambedkar used "F****k" word at Times Now editor!
They never condemned Rajdeep for inviting Shamnath Baghel murder accused (anti Naxal activist of Bastar- Chhatissgadh) Nandini Sundar in TV show as Naxal expert!

This is pathetic state of Fourth Estate of democracy!

They used to corner BJP-RSS by saying constitution, free speech and freedom of expression under threat; but behaves in diagonally opposite when they refuse to let speak people from BJP-RSS in their respective TV studios!

This is the reason why Bhau Torasekar, popular author and Marathi writer with thousands of followers on SM doesn't belong to mainstream media community!  Bhau Torasekar never shook hands with these "Sold Out" media guys and firmly stood for his thoughts!

With this article, many in media would let their guns blazing against me, they would thrash and intimidate me in strongest and dirtiest terms available! But I just don't care! Even if they file litigation against me for this piece, I would exploit it to expose their disgusting manipulative journalistic practices and money laundering business.

The media has lost its position as harbinger of information due to advent of Social Media. So keep on pampering bloody Naxal-Maoists terrorist and expect few more lots of megabucks or whatever you would get as quid pro quo for lashing and whipping of nationalists!

Keep up your payback exercise to your masters by showcasing bloody terrorists as activists and intellectuals! Help doom your credibility to new lows! 

I have great respect for those journalists which never buckled for few sips and for minor kickbacks. I would like to seek apologies for those who belongs to this profession but never compromised for any earthly returns!

But this was my duty to expose those who have dubious credentials though pretending to be the savior of fundamental rights and liberties!

Come on have few minutes of silence for Death of Profession of Journalism!

Condolences!

--- Vinay Joshi

पत्रकार नक्षलींचं पैदास केंद्र- मुंबई प्रेस क्लब

पत्रकार नक्षलींचं पैदास केंद्र- मुंबई प्रेस क्लब 
---- विनय जोशी 

-मिडीया पकडलेला नक्षलवाद्यांना "विचारवंत-अॅक्टिविस्ट-मानवाधिकार कार्यकर्ते" म्हणुन का दाखवते आणि हिंदुत्ववादी विचारांची हेटाळणी मिडीयाच्या रक्तात का मुरली आहे याचा आढावा 

सध्या आणि गेली अनेक वर्षे वेगवेगळ्या तुरुंगात असलेला नक्षली कोबाड घंडी याची बायको अनुराधा घंडी काही वर्षांपूर्वी गेली. ती स्वतः हिंसक माओवाद्यांच्या सेन्ट्रल कमिटीची सदस्य होती. तिच्या स्मरणार्थ अनुराधा घंडी मेमोरियल कमिटी असा ट्रस्ट आहे. हा ट्रस्ट दरवर्षी "अनुराधा घंडी मेमोरियल लेक्चर" आयोजित करतो. २०१६ अमेरिकन निग्रो स्त्रीवादी अन्जेला डेविस या लेक्चरला येऊन भारतात दलित कसे असुरक्षित आहेत यावर भाषण मारून गेली. 

२०१७ च्या नवव्या अनुराधा घंडी मेमोरियल लेक्चरला परवा अटक झालेला नक्षली वारा वारा राव आला होता. हे लेक्चर मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात आयोजित केलं होतं. लीगल राईट्स ऑब्सर्वेटरीने या लेक्चरला परवानगी देऊ नये अशी विनंती मुंबई पोलिसांना केल्यावर धावपळ उडाली. मग मुंबई मराठी पत्रकार संघाने मिडीयाला असा कोणताही कार्यक्रम आमच्या सभागृहात आयोजित केलेला नाही असं सांगायला सुरुवात केली. कारण हे लेक्चर पत्रकार संघातल्या नक्षल समर्थक लोकांच्या कृपेने तोंडी परवानगीने आयोजित केलेलं होतं.

बऱ्याच गोंधळानंतर सध्या न्यू इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार गुरबीर सिंग यांच्या नावाने मुंबई मराठी पत्रकार संघाला कार्यक्रमाच्या परवानगीचं पत्र देण्यात आलं. आणि पत्रकार संघाने परवानगी देऊन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला स्टेजवर काही डावे पोपट वक्ते, समोर महाराष्ट्र सी.आय.डी., सेन्ट्रल एजन्सीजचे अधिकारी, मोजकेच श्रोते आणि अनेक रिकाम्या लाल खुर्च्या उपस्थित होत्या. संपूर्ण राष्ट्रीय मिडीयाने यावर रीपोर्ट छापले, "Ghandy Memorial Lecture concluded peacefully despite Right Wing group Legal Rights Observatory's threat to disrupt it!". म्हणजे स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्यांना "थ्रेट" आणि "लीगल नोटीस" यातला फरकही कळत नाही अशी स्थिती.

"पुरोगामी" महाराष्ट्राच्या राजधानीत झालेल्या आणि गेली ९ वर्षे होत असलेल्या या अनुराधा घंडी मेमोरियल लेक्चरला आलेला नक्षल नेता वारा वारा राव म्हणाला गेल्या ५० वर्षात नक्षलवादापेक्षा  मलेरियाने जास्त माणसे मेली आहेत! याला सर्क्युलर लॉजिक म्हणतात. १९७५ च्या आणीबाणीचं समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांचा आवडीचा युक्तिवाद असतो, "बाकी काही असो पण आणीबाणीमुळे देशात शिस्त आली!". यावर प्रसिद्ध कायदेपंडीत, भाजपा नेते अरुण जेटली यांनी सन २००० मध्ये इंडिया टुडेमध्ये लिहिलेल्या लेखात कॉंग्रेसला प्रश्न विचारला होता, "असं म्हणतात की प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म त्यांच्या आईवर झालेल्या बलात्कारातून झाला, म्हणुन काय उत्तम शास्त्रज्ञ जन्माला येण्याच्या अपेक्षेने आपण बलात्काराला कायदेशीर मान्यता द्यावी का?
नक्षलवाद आणि मलेरिया यांची तुलना ही याच प्रकारची आहे! पण हे डावे अत्यंत उर्मट आणि स्वतःला शहाणे समजणारे असतात, त्यांचासमोर बोलणार कोण?

तर अशा या नक्षलवादी कार्यक्रमाला परवानगी मागणारे श्रीमान गुरबीर सिंग, म्हणजेच कपिल सिब्बल यांचे माजी मेव्हणे! यांची मुंबईच्या पत्रकार वर्तुळात भूमिका काय तर हे पत्रकार कल्याणासाठी आपली ओळख आणि वट वापरून दर वर्षी लाखो रुपये जमवतात. गुरबीर सिंग स्वतः "पुरोगामी" आहेत, याचा अर्थ नक्षली हिंसा सरकारच्या फसलेल्या नीतीचा परिणाम आहे वगैरे वगैरे सिद्धांत मांडणारे आहेत. 

गुरबीर सिंग यांनी जमवलेल्या प्रचंड पैश्यावर मुंबई प्रेस क्लब चालतो. तिथे अनेक "सोयी" आणि "सुविधा" पत्रकारांना पुरवल्या जातात. पत्रकारांचे "कल्याण" होते! पंचतारांकित मुंबई प्रेस क्लब मध्ये बसुन "विडंगारिष्ट", "कुटजारीष्ट" वगैरे विदेशातील रसशाळांमध्ये तयार केलेले भयंकर महागडे आयुर्वेदिक काढे पत्रकार बंधुंसाठी अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जातात. आणि असे काढे घेतल्यानंतर आमचे पत्रकार बंधु "समाजातील विषमता", "महाराष्ट्रातील दुष्काळ", "गरिबांच्या कल्याणाचे उपाय", "मोदीमुळे संविधानाला निर्माण झालेला धोका" यावर तासनतास विचारमंथन करतात. पत्रकार बंधू एवढ्या प्रतिकुल परिस्थितीत कंबर मोडेपर्यंत काम करतात म्हणुन देश चालतो!!!
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यकारिणीवर असे अनेक लोक आहेत ज्यांनी जन्मात चार सलग आणि सुसंबंध ओळी लिहिल्या नाहीत. सध्याच्या कार्यकारिणीवर असेही महाभाग आहेत ज्यांच्या शेल कंपन्या आहेत, काळ्याचे गोरे करणे हाच त्यांचा मुख्य धंदा आहे आणि "पत्रकार" असणं ही त्यांची काळे धंदे लपवण्याची ढाल आहे. (याबद्दल आक्षेप असेल तर ते खटला भरू शकता- चुक असेल तर माफी मागु!)

प्रसन्न जोशी कॅप्टन स्मिता गायकवाडांवर आणि राजदीप सरदेसाई तुषार दामगुडे यांच्यावर नक्षल विषय आला की का किंचाळतात?

तर गुरबीर सिंग स्वतः टोकाच्या डाव्या विचारसरणीचे आहेत आणि त्यांनी अपार मेहनतीने जमवलेला पैसा मुंबई प्रेस क्लबमध्ये अत्यंत उंची "विडंगारिष्ट", "कुटजारीष्ट" वगैरे भयंकर महागडे आयुर्वेदिक काढे खरेदी करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे प्रसन्न जोशी, राजदीप सरदेसाई, समर खडस, सुधाकर काशिद आणि अन्य अनेक पत्रकार बंधु त्यांचे "बडे भाईसाब" गुरबीर सिंग यांची मर्जी पलटेल असे वागत नाहीत.  

गुरबीर सिंग यांच्या सारख्यांनी फेकलेल्या याच तुकड्यांवर पोसलेले पत्रकार, कोळसे पाटील यांनी भर टीव्ही स्टुडियोमध्ये समोरच्याला "ए कुत्र्या गप्प बस..." वगैरे म्हटले किंवा त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली तरी परत परत कोळसे पाटलांनाच बोलावतात.  भर स्टुडियोत प्रकाश आंबेडकर पत्रकाराला म्हणाले, "तुझी ***** मारीन" तरी माना खाली खालुन गप्प बसतात... शामनाथ बाघेल या नक्षल विरोधी कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणात प्रमुख आरोपी नंदिनी सुंदरला राजदीप नक्षल एक्स्पर्ट म्हणून बोलावतो!

असा हा आपला लोकशाहीचा सडलेला, चौथा स्तंभ आहे (चौथा स्तंभ ही पदवी त्यांनी स्वतःच स्वतःला लाऊन घेतली आहे!), जो बाहेरून मोठ्या बाणेदारपणाचा आव आणतो पण प्रत्यक्षात यांना पाठीचा कणाच शिल्लक राहिलेला नाही! 

हिंदुत्ववादी विचार राजकारणात प्रबळ झाल्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली आहे, संविधान धोक्यात आहे आणि भाजप-संघ विरोधी विचारांचा आवाज दाबत आहेत; असा आरोप करणारे हे पत्रकार त्यांच्या स्टुडीयोमध्ये आलेल्या विरोधी विचारांच्या लोकांचा आवाज कसा दाबतात, त्यांना बोलायची संधी कशी नाकारतात हे आपणं रोजंच बघत असतो. त्यामुळे त्यांनी केलेले सर्व आरोप आपली पापे लपवण्यासाठी आहेत अशी लोकांची भावना झाली आहे आणि याला, "उल्टा चोर, कोतवाल को डांटे!" असं म्हणतात!

एकीकडे आपण निर्भीड आणि स्वतंत्र पत्रकार असल्याचा आव आणुन प्रत्यक्षात राजकीय बाजु घेऊन बोलायचे हा यांचा धंदा आहे आणि त्यामुळे "नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा" ही म्हण अशा पत्रकारांना लागु पडते.

भाऊ तोरसेकरांसारखे लोक मिडीयाच्या मुख्य प्रवाहात का नाहीत, याचं उत्तरही यातंच लपलेलं आहे. भाऊ तोरसेकर यांच्यासारख्यांना गुरबीर सिंग प्रवृत्तीनी फेकलेले तुकडे मनापासून आवडत नाहीत, त्यामुळे मुख्य मेनस्ट्रीम मिडीया त्यांना पत्रकार मानत नाही!
हे सर्व वाचुन अनेकांची डोकी भडकतील, अनेक जन बदनामीच्या केसची धमकी देतील, अनेक जन चारीत्र्यहननाचा प्रयत्न म्हणुन लिहिणाऱ्याची निंदा करतील; पण हे सर्व प्रयत्न हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला मदत करतील. याविरुद्ध बोंब मारणे पत्रकारांच्या जराही हिताचे नाही (वाचा आणि गप्प बसा!), कारण पत्रकारांचा गलिच्छ व्यवहार लोकांसमोर रोज येत आहे. यच्चयावत सर्व पेपर्स आणि चॅनल्सनी परवा अटक केलेले नक्षली  "विचारवंत-अॅक्टिविस्ट" म्हणुन जगासमोर मांडले. त्यामुळे "पत्रकारितेची" यांनी स्वतःच्या हातानेच "चिंधीकारीता" केली आहे. यांनी एकदा सोशल मिडीया बघितला म्हणजे त्यांच्याबद्दल सामान्य माणसाच्या भावना किती तीव्र आहेत ते त्यांना कळेल. 

तसंही मिडीयाची मोनॉपॉली, मस्ती आणि एकंच विचारसरणी जगासमोर आणण्याची अव्यावसायिक वृत्ती सोशल मिडीयामुळे पुर्णपणे मोडुन पडली आहे. त्यामुळे पत्रकारांचे, हिंसक लोकांना "विचारवंत-अॅक्टिविस्ट--मानवाधिकार कार्यकर्ते" म्हणुन दाखवण्याचे; देशद्रोहाला महीमामंडीत करण्याचे आणि हिंदु चालीरीतींना "मागास" म्हणुन हिणवण्याचे धंदे यापुढे कोणीही खपवुन घेणार नाही.

खड्ड्यात गेलेली प्रतिष्ठा परत मिळवायची असेल, तर पत्रकारांनी देशभर पसरलेल्या "गुरबीर सिंग" प्रवृत्तीच्या लोकांच्या ओंजळीने पाणी पिणं बंद करावं आणि स्वतःच्या मेंदुने घटनांचं विश्लेषण करावं. हे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर गेलेली प्रतिष्ठा परत मिळेल.

या क्षेत्रात अजुनही अनेक जण मुल्ये आणि कोणतीही असली तर एक पक्की विचारधारा बाळगुन जन्मभर त्याच्याशी प्रामाणिक राहणारे पत्रकार आहेत. त्यांच्या भावना या लेखामुळे दुखावतील. अशा सर्व पत्रकार बांधवांची मी आधीच दिलगिरी व्यक्त करतो.. पण हे कुणीतरी, कधीतरी समोर आणणं आवश्यक असल्याने लिहिलं आहे...

कारण लोकशाहीचा चौथा स्तंभ आता अदृश्य झाला आहे....



Thursday, August 30, 2018

डाव्यांच्या "सहस्रसुर्यदर्शन" सोहळ्याची ही सुरुवात आहे

--- विनय जोशी 

Image may contain: 1 personराजदीपचा "सहस्रसुर्यदर्शन" सोहळा पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात आहे. एक वकील आणि काही लोक त्याची तयारी गेली कित्येक दिवस करत आहेत.

परवा झालेला "सहस्रसुर्यदर्शन" कार्यक्रम एवढा परिणामकारक आहे की वारावारा राव सारखे बेफिकीर लोक सुद्धा मुळापासून हलले. ज्याची स्वप्नातसुद्धा कल्पना केलेली नसेल ते प्रत्यक्षात झालं की असं होणारंच!
तुषारच्या कालच्या लाइव्ह मुलाखतीच्या वेळी राजदीपच्या डोळ्यातून नेहमी उतून वाहणारा माज, घमेंड, नसलेल्या ज्ञानाची मस्ती, अहंकार, समोरचा कोणीतरी फालतू 'अनपढ', 'गवार' आहे हे सर्व भाव गायब होते आणि त्या सगळ्याची जागा 'चिंता', 'भिती','असुरक्षितता','वेदना','अनिश्चितता' या शुद्र मानवांना सतावणाऱ्या भावनांनी घेतली होती.
राजदीप आणि त्याची बायको गेल्या १५ वर्षात इतक्या वेळेला खोटं बोलले आहेत की आता लोक मोजायचे बंद झाले. अहंकार तर असा की हा 'बृहस्पती' चा साक्षात अवतार आहे आणि ह्याला जगातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हा म्हणेल ती पुर्व दिशा आणि हा म्हणेल तेच खरं. 
पण कायदेशीर नोटीस बसली आणि त्याच्या मालकांनी माफी मागायचे आदेश दिले की दोन पायात शेपुट घालुन पाळायला तयार (https://www.youtube.com/watch?v=h6nHt2hT_-8 )

पुढच्या महिन्यात राजदीपच्या मित्रांनी जो "सहस्रसुर्यदर्शन" कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनी समस्त पुरोगामी घंटुराम जी आगपाखड करतील ती बघायला जाम मजा येईल. अनेक वेळा खोटं बोलूनही हा मनुष्य इतका माजात कसा काय राहू शकतो हेच एक मोठं कोडं आहे. 
याची बायको आणि हा दोघांचे पुर्ण ३६ गुण जुळतात हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केलं आहे. त्या सोहळ्यात राजदीपच्या सौं-चं नाव आहे की नाही कल्पना नाही, पण असुही शकतं!

असे अनेक "सहस्रसुर्यदर्शन" २०१९ च्या लोकासभेपुर्वी झाले तर परिस्थिती आटोक्यात राहील. ज्यांनी कोरेगाव-भीमा भडकवलं ते सगळे सध्या एका मोठ्या मानसिक धक्क्यातुन जात आहेत. धाडी पडुन ४८ तास झाले तरी प्रकाश आंबेडकर नेहमीच्या आवेशात कुठेही दिसत नाहीत. तेलतुंबडेच्या गोव्यातल्या घरावर छापा पडल्याने ज्यांना जे कळायला पाहिजे ते कळलं आहे.

प्रशांत भुषण आणि कंपनी एका अनामिक भीतीने वेडे झाले आहेत. आधीच्या आयुष्यात जी जी पापं केली आहेत त्या पापांचे एफ.आय.आर. मध्ये कोणत्याही क्षणी कन्वर्जन होऊ शकतं ही भीती अतिशय मोठी आहे. अटकेच्या वेळी वारा वारा राव त्याच्या घरी उपस्थित त्याच्या एका मित्राला म्हणाला, '१९७५ च्या आणीबाणीच्या नंतर माझ्या घरात पाय ठेवायची हिम्मत आजपर्यंत कुणी केली नव्हती, पण आज महाराष्ट्र पोलीस थेट इथे पोचलेत". 
त्याचा सगळा 'रुतबा', 'ऐट' आणि 'करिष्मा' कचऱ्याच्या टोपलीत टाकुन महाराष्ट्र पोलीस त्याचं बोचकं बांधुन महाराष्ट्रात घेऊन आलेच! आणि यापुढचा मामलाही सोपा नाही, UAPA च्या कलमांखाली हे अटकसत्र आहे. कोणत्याही कोर्टाला जामिनाची सुनावणी करताना हजारवेळा विचार करावा लागेल.

डावे कालपर्यंत भारताचे अनभिषिक्त सम्राट असल्याच्या मस्तीत वावरत होते, ती सगळी मस्ती एका फटक्यात मोडली... याच निराशेतून एका कफल्लक कुसंस्कृत माणसाने टीव्हीवर तुषार दामगुडेला "कुत्रा" म्हटलं! समोर काय वाढून ठेवलंय याची चाहुल लागली की जीभ बेकाबु होणारंच!

भविष्यातील अशा अनेक "सहस्रसुर्यदर्शन" कार्यक्रमांना पोलिसांना खूप खूप शुभेच्छा! 






Wednesday, August 29, 2018

सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती? शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!


Image may contain: one or more people and glasses

सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती?
शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!

---- विनय जोशी
सनातनवरील बंदीला तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांचाच विरोध होता! १ डिसेंबर २०१५ ला लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे तावातावाने मोदी सरकारला जाब विचारात होत्या की तुम्ही सनातनवर बंदी का घालत नाही? त्यावर मंत्री किरेन रिजीजु यांनी त्यांना उत्तर दिलं की सनातनवर बंदी घालण्याएवढे पुरावे सरकारकडे नाहीत आणि बंदी कोर्टात टिकणार नाही, असं तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम याचं मत होतं!
मुख्य प्रश्न आहे, की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सनातनवर बंदीच्या विरोधात का होते?
महाराष्ट्रात सनातनने अतिशय वेगाने आपला पसारा वाढवला. संघ आणि संबंधित हिंदु संघटना ज्या समाजघटकात ५० वर्षात पोचु शकल्या नाहीत त्यात सनातन फक्त ५ वर्षात पोचली. खेड्यापाड्यात आक्रमक हिंदुत्व मांडणारे हिंदु मेळावे सुरु झाले. संघाची हिंदुत्वावरील मक्तेदारी मोडणारी एक शक्ति उदयाला येतेली बघुन महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारने सनातनाकडे काणाडोळा केला. त्याची परतफेड म्हणुन सनातन त्यांच्या वृत्तपत्रात संघाला, सरसंघचालकांना तिरकस आणि जोरकस प्रश्न विचारू लागली, "हेच का तुमचे हिंदुत्व", "ह्यालाच हिंदुराष्ट्रवाद म्हणतात?" वगैरे. कॉंग्रेस सरकारमधील राष्ट्रवादीचे गृहमंत्री आबा पाटील यांनी सनातनवरील बंदीच्या मागणीकडे साफ साफ दुर्लक्ष केलं असा आरोप अनिसचे श्याम मानव यांनी केला आणि वर हेही सांगितलं की आबांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी शरद पवारांकडे गेलो आणि त्यांनी बंदीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं!
या सरकारने बंदीचा प्रस्ताव त्यांच्याच केंद्र सरकारला पाठवला पण एकुणच ही "नूरा कुश्ती" म्हणजे खोटी कुस्ती होती त्यामुळे केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळला. ठाण्यात सुतळी बॉम्बच्या स्फोटात सनातनचे काही लोक पकडले जाऊनही बंदीचा प्रस्ताव फेटाळला गेला हे आणखी एक नवल!
सनातनचा कॉंग्रेसला उपयोग काय?
शिवसेना जेव्हा अतिशय नवीन होती तेव्हा कॉंग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी- वसंतरावांनी कम्युनिस्टांची ट्रेड युनियन मधील दादागिरी मोडुन काढण्यासाठी शिवसेनेला बळ दिलं. त्यामुळे शिवसेनेला गंमतीने "वसंतसेना" म्हणायचे! हाच प्रयोग संघाला शह देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सनातनच्या बाबतीत करत होते.
आबा पाटील पक्षशिस्त मानणारे नेते होते, शरद पवारांना फाट्यावर मारण्याची त्यांची इच्छा कधीच नव्हती, त्यामुळे श्याम मानव म्हणतात तसं आबांनी सनातन बंदीचा प्रस्ताव फेटाळला तो पवारांच्या हुकुमावरूनच आणि नंतर पवारांनी स्विकारला तो धोरण म्हणुनच. पण वास्तवात सनातनवर बंदी घालुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सनातनच्या प्रचंड मोठ्या साधक वर्गाला दुखावण्याची अजिबात इच्छा नव्हती.
जर सनातन आहे तशीच झपाट्याने वाढत राहिली संघाचा "हिंदुत्व" जनाधार घसरेल आणि परिणामी भाजपचा प्रसार कमी होईल अशी भोळी आशा मनात होती. पण ती फोल ठरली.
मग सनातन घातपातात सामिल आहे अशा बातम्या पुढे येऊ लागल्या तेव्हा त्याला "हिंदु आतंकवाद" नावाच्या नव्या लेबलखाली संघाशी जोडुन सगळ्यांना एकत्र बदनाम करता येईल या हिशेबाने कॉंग्रेस साठी सनातनची उपयोगिता वाढली. पण लोक संघ-सनातनला एका मापात मोजायला तयार होईनात.
मग सनातनचे संस्थापक डॉ. आठवले ब्राह्मण आहेत (अनुयायी बहुसंख्य बहुजन असले तरीही!) त्यामुळे सनातनला "ब्राह्मणी कावा", "मनुवादी" यांच्याशी जोडणं सोपं जाईल म्हणुन ती सगळ्यांच्याच सोयीची "पंचिंग बॅग" झाली.
पण यातला एकही प्रकार कॉंग्रेसच्या निर्णायक आणि निखळ फायद्याचा ठरेना, त्यामुळे आता सगळं घोंगडंं भाजप सरकारच्या गळ्यात घालून दोघेही मोकळे झाले!
संघ-भाजप यांच्या हिंदुत्वाची सगळ्यात अर्वाच्य भाषेत हेटाळणी सनातने केली आहे. संघ प्रमुख मोहनराव भागवतांवर सर्वात खालच्या पातळीवरून टीका सनातनने केली आहे. आणि तरीही राजकीय फायद्यासाठी सनातन-संघ यांना एकाच मापाने मोजण्याचे प्रकार बिनदिक्कत चालु आहेत.
काल पकडलेले लोक खरंच गुन्हेगार आहेत का? ते सनातन ते खरंच साधक आहेत का? ते खरंच धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणार होते का? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत.
पण..... एक गोष्ट नक्की आहे, राजकीय फायद्यासाठी आणि नेहरू-इंदिरा गांधी- सोनिया गांधी यांनी आपट-आपट-आपटून जो संघ संपला नाही तो सनातनच्या उग्र हिंदुत्वाच्या काठीने संपवण्याचा आणि वसंतसेनेच्या माध्यमातुन अजुन एक नवीन शिवसेना स्थापुन संघाला "काऊंंटर बॅलन्सिंग फोर्स" तयार करण्याचा मोठा प्लान मात्र सपशेल तोंडावर आपटला आहे!
No automatic alt text available.

ज्ञान प्रबोधिनी- संघ परस्पर संबंध, सनातनच्या पार्श्वभूमीवर

ज्ञान प्रबोधिनी- संघ परस्पर संबंध, सनातनच्या पार्श्वभूमीवर
--- विनय जोशी 

स्वातंत्र्याच्या नंतर लगेचंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन उमदे, बुद्धिमान प्रचारक श्री. आप्पासाहेब पेंडसे आणि श्री. मधुकरराव देवल संघाची वाट सोडुन वेगळ्या वाटेवर निघाले. तत्कालीन संघप्रमुख श्री. गोळवलकर गुरुजी यांच्याशी त्यांचे संघाची कार्यपद्धती आणि समाजसेवा यासंदर्भात सैद्धांतिक मतभेद होते असं म्हणायला भरपूर जागा आहे.

पुढे श्री.आप्पासाहेब पेंडसे यांनी पुण्याला ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली आणि श्री. मधुकरराव देवल सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या आपल्या मूळ गावी जाऊन 'एकात्म समाज केंद्रा’ च्या माध्यमातुन दलित समाजाच्या उत्थानाचे काम करू लागले.

बघता बघता ज्ञान प्रबोधिनीने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. वेगवेगळे अभिनव उपक्रम, शाळा, कौशल्य विकास आणि थोडक्यात म्हणजे विद्यार्थ्यांना जन्मभर पुरतील असे संस्कार देणारी एक सक्षम व्यवस्था निर्माण केली. अत्यंत सकारात्मक विचार करणारी, एकसो एक विद्वान, बुद्धिमान, ध्येयनिष्ठ हजारो- लाखो माणसे प्रबोधिनीने समाजात शब्दशः ओतली. महाराष्ट्रात सध्या आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या लाटेमध्ये प्रबोधिनीची भुमिका महत्वाची आहे. सध्याही तिथे या संदर्भातील उपक्रम चालत असतात.

एकंच काम डोळ्यासमोर ठेऊन, जन्मभर त्यात स्वतःला झोकुन देऊन त्या कामात सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे अनेक जण यातुन बाहेर पडले आहेत. आपण केलेल्या कामाचा अजिबात गवगवा, मार्केटिंग, श्रेयवाद नं लाटता, सतत ठरलेल्या वाटेवर चालणारे लोक प्रबोधिनीने समाजाला दिले आहेत. त्यांनी केलेली कामे सर्वोच्च दर्जाचीच असणार आणि त्या त्या क्षेत्रात ती सर्वात उंचावरच असणार याबाबत प्रबोधिनीच्या बाहेरील लोकांनाही पुर्ण खात्री आहे, हेच प्रबोधिनीचं सगळ्यात मोठं यश आहे.

प्रबोधिनीने उपलब्ध कार्यकर्ते आणि संसाधने यांची योग्य सांगड घालुन कामे उभी केली आहेत. अंथरूण पाहुन पाय पसरल्यामुळे अनियंत्रित, असंबंध फाफट पसारा त्यांनी वाढवला नाही आणि त्याच्या दर्जाशी जराही तडजोड केली नाही. संघातुन बाहेर पडलेले आप्पासाहेब यांनी स्थापन केलेली असली तरी त्यांनी स्वतः संघाचा कधीही द्वेष केला नाही, त्यामुळेच तो प्रबोधिनीच्या मानसिकतेत कुणालाही शिवला नाही. त्याशिवाय संघाजवळ स्पर्धा करण्याची ईर्षा त्यांच्या मनाला शिवली नाही, त्यामुळे त्यांच्या मनात समाजसेवा म्हणुन जो काही विचार होता, तो त्यांनी अपार कष्ट करून जमिनीवर आणला आणि संघ ज्या क्षेत्रात काम करत नव्हता त्यात त्यांनी मुसंडी मारून एक "बेंचमार्क" तयार केला.

ज्यातुन ते बाहेर पडले त्या संघाशी काही ना काही मतभेद असणं स्वाभाविक आहे पण ते कधीही कटुतेमध्ये परिवर्तीत झाले नाहीत. संघ "क्वान्टीटी" च्या मागे लागुन "क्वालिटी" मध्ये तडजोड करतो असा प्रबोधीनितल्या बऱ्याच जणांचा आक्षेप आहे (ह्याला सकारात्मक टीका म्हणतात). काही अंशी तो बरोबरही असू शकतो.

आपण कोणीतरी आहोत हे दाखवण्यासाठी दुसरा वाईट आहे, हे दाखवण्याची प्रबोधिनीला कधीही गरज भासली नाही.

दुसरे श्री. मधुकरराव देवल, जे आप्पासाहेब पेंडसे यांच्यासारखेच संघ प्रचारक होते. त्यांनी आपल्या म्हैसाळ या मूळ गावी जाऊन दलित समाजाच्या विकासासाठी प्रचंड धडपड करून दलित बांधवांचा मोठा विश्वास मिळवला. 'एकात्म समाज केंद्रा’ या नावाने सुरु केलेल्या या कामाने त्यांनी जादु घडवली. त्यांच्या कार्यावर वसंत देशपांडे यांनी १९८४ साली 'म्हैसाळ : दलितमुक्तीचा एक प्रयोग'. हे पुस्तक लिहिलं. त्याला नाटककार विजय तेंडुलकर (हातात पिस्तुल मिळालं तर पहिली गोळी मोदीला मारीन म्हणणारे ते हेच!!!) यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात देवलांच्या कामाचा आणि त्यांच्या कामामुळे दलित समाजाच्या वाढलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तराचा विस्तृत अहवाल दिला आहे. देवलांनी स्थापन केलेली "श्रीविठ्ठल सहकारी शेती सोसायटी" ही खरोखर दलितांनी-दलितांसाठी चालवलेली संस्था आहे आणि या संस्थेने गावकऱ्यांचा आर्थिक उद्धार झाला. देवलांच्या कामाची पु.ल. देशपांडे यांनीही खूप स्तुती केली आहे.

अशा, म्हणजे संघापासून फारकत घेऊन काम करणाऱ्या मधुकरराव देवल यांच्याशी संघ कसा वागला? संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना पुढे लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला. बाळासाहेबांनी पुरस्काराची सर्व रक्कम श्री. मधुकरराव देवलांच्या म्हैसाळ प्रकल्पाला देऊन टाकली. कोत्या मनोवृत्तीची संघटना अशी वागेल?

ज्ञान प्रबोधिनी आसामच्या आसपास अनेक शैक्षणिक प्रयोग करत असते. स्थानिक संघ प्रचारक जेव्हा आणि जशी गरज पडेल तेव्हा आणि तशी मदत त्यांच्या कामात करत असतात. प्रबोधिनीच्या कामाचा संघाच्या कामाला अप्रत्यक्ष उपयोग होतंच असतो. पण संघ आणि प्रबोधिनी यांना कोणत्याही प्रकारची स्पर्धा एकमेकांशी करण्यात रस नसल्याने ज्याला, जिथे, जेव्हा मदत लागेल तेव्हा तो ती मागतो आणि दुसरा निसंकोचपणे ती देतो.

प्रबोधिनी अत्यंत सकारात्मक विचार रुजवण्याच्या नादात स्वप्नाळु, समाजात चालणाऱ्या वास्तविक व्यवहारांच्या बाबतीत पुर्णपणे अनभिज्ञ पिढी घडवते असा काही संघवाले आक्षेप घेतात (सकारात्मक टीका अशी केली जाते!!!). पण हा आक्षेप आत्यंतिक विषारी दिशेने कधीही जात नाही.

निष्कर्ष:-
संघ सैद्धांतिक मतभेद सैद्धांतिक पातळीवरून हाताळतो (समोर परिपक्व लोक असतील तर!!!), त्याला विरोधासाठी विरोध आणि विषारी अपप्रचाराच्या पातळीवर जाऊ देत नाही, कारण असले धंदे करायला कुणालाच रिकामा वेळ नसतो.

मागील तीन लेखात "सनातन" संघाविरोधात सोंगटी म्हणुन कशी वापरली गेली आणि 'सकारात्मक टीका' अशा गोड लेबलखाली सनातनच्या प्रकाशनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांवर किती गलिच्छ आणि खोटेनाटे आरोप केले त्याचा आढावा आपण घेतला. २००६ ला श्री. गुरुजी जन्मशताब्दी निमित्त संघाने देशभर हिंदु संमेलने घेतली त्यांनतर सनातनने तशीच हिंदु संमेलने गावोगाव घेतली (याबद्दल सनातनचे आभार). आणि नंतर कोणीतरी अज्ञातपणे चावी फिरवल्यावर सनातनचा संघाविरोधात अतिशय विषारी, द्वेषपूर्ण प्रचार सुरु झाला.

संघविरोधी घाणेरड्या प्रचारानंतर लोकांनी तिखट प्रतिक्रिया दिली की "सकारात्मक टीकेची" ढाल वापरायची आणि प्रत्यक्षात चारित्र्यहनन करायचं ही सनातनची जुनी सवय आहे. ती यापुढे कायमची बंद होईल अशी आशा आहे!

मागील तीन आणि हा चौथा लेख यानंतर "सनातन" ला "सकारात्मक टिके" चा अर्थ कळला असेल अशी अपेक्षा बाळगुया आणि नवीन लेख लिहायची गरज भासणार नाही अशीही खात्री ठेवुया!



Tuesday, August 28, 2018

बलात्कारगृहे, लैंगिक अत्याचार माफीनामा आणि अमेरिकन कार्डीनलचा लैंगिक महाघोटाळा- कॅथोलिक चर्च अभुतपूर्व संकटात

बलात्कारगृहे, लैंगिक अत्याचार माफीनामा आणि अमेरिकन कार्डीनलचा लैंगिक महाघोटाळा- कॅथोलिक चर्च अभुतपूर्व संकटात 

---  विनय जोशी 

पोपच्या आयर्लंड दौऱ्यात झालेली निदर्शने आणि वॅटिकनच्या अमेरिकेतील माजी राजदूत आर्चबिशप कार्लो मारिया विगानो यांनी पोपवर गंभीर आरोप करून पोपच्या राजीनाम्याची मागणी केल्याने कॅथोलिक चर्च अभूतपूर्व संकटात.

"मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील महिलांची आणि अविवाहित गरोदर महिलांची 'महिला आणि बालगृहे' यात जन्माला मुले यांना बळजबरीने हिसकावून घेऊन यांना अज्ञात लोकांना विकणे आणि दत्तक देणे; बिशप, फादर्स आणि चर्च नेतृत्वाने आपल्या अधिकारांचा वापर करून चर्च नियंत्रित शाळा, होस्टेल, धार्मिक संस्थाने यातील लहान मुले आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणे अशा अनेक कारणांमुळे कारणांबद्दल पोप फ्रान्सिस यांनी आयरिश लोकांची जाहीर माफी मागितली.  पण वर्षानुवर्षे "मॅग्दालीन लाउंड्रीज" संपुर्ण आयुष्य सडलेल्या, "मॅग्दालीन लाउंड्रीज" च्या भिंतींच्या मागे अनन्वित लैंगिक आणि मानसिक अत्याचार झालेल्या हजारो पीडित महिलांना आर्थिक नुकसाभरपाई देण्याच्या मागणीवर पोपने सूचक मौन पाळले.

पुर्वी पोपच्या आयर्लंड दौऱ्याच्या वेळी प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसत होते ते यावेळी कर्फ्यू सदृश परिस्थिती डब्लिनच्या रस्त्यांवर दिसून आली. 

कार्डीनल थियोडोर मॅककॅरिकचे भयंकर अत्याचार!
कार्डीनल थियोडोर मॅककॅरिक या अमेरिकन कॅथोलिक कॅथोलिक नेत्याने त्याच्या आयुष्यात चर्चमध्ये येणारे भाविक ख्रिश्चन, त्यांच्या बायका, मुले, एवढंच नाही तर चर्चमधील त्याच्या हाताखाली काम करणारे ब्रदर्स, फादर्स, बिशप मिळेल त्या माणसाचा शारीरिक उपभोग घेतला. ही सर्व पापे त्यावेळचे वॅटिकनचे  अमेरिकेतील राजदूत आर्चबिशप कार्लो मारिया विगानो यांनी पोप फ्रान्सिसच्या कानावर घातली, परंतु पोपने याकडे साफ दुर्लक्ष करून लिंगपिसाट कार्डीनलच्या पापांवर पांघरूण घालण्यात पुढाकार घेतला. आणि हा आरोप खुद्द आर्चबिशप कार्लो मारिया विगानो  यांनीच केला आहे.
शेवटी ५ वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर कार्डीनल थियोडोर मॅककॅरिकचा राजीनामा घेण्यात आला.

कॅथोलिक चर्च जगात सर्वत्र अध्यात्मिकतेचा बुरखा घालुन भयंकर पापे करत आलेले आहे. आता फरक एवढाच आहे की सामान्य कॅथोलिक ख्रिश्चन चर्चमधल्या भयंकर नैतिक आणि आर्थिक पापांमुळे पूर्णपणे उबला आहे.

आम्ही भारतीयच अजून तरी कॅथोलिक चर्चला शांतीदूत मानत आहोत. पण सध्या भारतभरात कॅथोलीकांनी विकलेली अर्भके, फादर्सनी  केलेले सामुहिक बलात्कार, कॅथोलीकांनी हडपलेल्या हजारो एकर जमिनी, खाल्लेले पैसे यामुळे भारतीय समाज आणि भारतीय कॅथोलिक कम्युनिटी लवकरच चर्चच्या मायाजाळातून बाहेर आलेली बघायला मिळेल अशी भोळी अपेक्षा आहे!






Monday, August 27, 2018

कैथोलिक धर्मान्तरण इंडस्ट्री बेनकाब- हजारो ट्रायबल बच्चे मानव तस्करी गैंग के जरिये पंजाब भेजे गए|

कैथोलिक धर्मान्तरण इंडस्ट्री बेनकाब- हजारो ट्रायबल बच्चे मानव तस्करी गैंग के जरिये पंजाब भेजे गए|

---विनय जोशी

Image may contain: 1 person, textझारखण्ड में चर्च द्वारा किए जा रहे कुकर्मों के ऊपर से परते लगातार उठती जा रही है| हर गुजरते दिन चर्च के द्वारा किए गए नए नए घपले दुनिया के सामें आ रहे है| पहले मिशनरीज ऑफ़ चैरिटीज की नन्स रांची में नवजात बच्चे बेचती पकड़ी गई और वो अब सलाखों के पीछे है | फिर खुंटी में ख्रिश्चन महिलाओं पर हुए गैंगरेप में सहयोग की वजह से एक कैथोलिक फादर अलफोंस भी गिरफ्तार हो चूका है|

इस नए मामले में झारखंड से पंजाब के लुधियाना में धर्मान्तरण के लिए भेजे गए 34 ट्रायबल बच्चों के बारे में खबर बाहर आ गई है, जिसके बाद झारखण्ड पुलिस हरकत में आ गई| लेकिन पंजाब में कांग्रेस की सरकार होने की वजह से झारखंड पुलिस बच्चों को बरामद नहीं कर सकी और राज्य पुलिस तथा गैर सरकारी संघठन पैस्किन मैरी क्रॉस चाइल्ड होम ने बच्चों को अज्ञात जगह भेज दिया ताकी झारखण्ड पुलिस उनका कब्जा ना ले सके|

बच्चों का रहस्यमय "रजिस्टर"
छापेमारी के लिए पहुंचे झारखण्ड पुलिस को वहा एक रजिस्टर भी मिला जिसमे लगभग 1000 ट्रायबल बच्चे और उनके झारखण्ड के पतों का उल्लेख था और जो इससे पहले पंजाब में "स्मगलींग" के जरिये धर्मान्तरण के लिए लाए जा चुके थे| लेकीन पंजाब पुलिस ने वह रहस्यमयी रजिस्टर गायब कर दिया ताकी "चाईल्ड ट्राफिकिंग" या "स्मगलिंग" में लिप्त ख्रिश्चन संस्था को बचाया जा सके| इस गायब रजिस्टर को जाँच के लिए सौपने के लिए पंजाब के दो बाल अधिकार कार्यकर्ता अदालत पहुंचे है, जिसकी वजह से रजिस्टर गायब करने वाले पंजाब के कई नागरी तथा पुलिस अधिकारी और उस संस्था के पदाधिकारी "जुवेनाइल जस्टिस एक्ट" के तहत कानुनी मुसीबत में फस सकते है|

दुनिया के हर कोने में कैथोलिक चर्च इसी प्रकार की काली करतुते बेरोंकटोंक करते आ रहा है लेकिन समाज के बुद्धिजीवी और समाजमन को प्रभावित करने वाले मिडीया को अपनी तरफ करके चर्च ने खुद की "मानवाधिकार, महिला अधिकार, बाल अधिकार" आदि अनेक प्रकार के मूलभूत अधिकारों का इकलौता ठेकेदार ऐसी प्रतिमा बड़े प्रभावी ढंग से बना ली है|

Image may contain: one or more people and textभारत के चर्च के अन्दर चल रहे लैंगिक, मानसिक, शारीरिक, आर्थिक और कई अन्य प्रकार के घोटाले लगातार बाहर आ रहे और इसी वजह से सुशिक्षित और संपन्न ख्रिश्चन मिडल क्लास तेजी से चर्च से दूर जा रहा है| ख्रिश्चन मडल क्लास अगर इसी प्रकार से और इसी गती से चर्च से दूर जाता रहा, तो युरप और अमरीका की तरह भारत में भी चर्च रियल इस्टेट के भाव में बेचे जाएँगे|
हिन्दुत्ववादी शासकों के अन्दर, चर्च के सभी बिशप्स और फादर्स अपनी जिंदगी में मिलने वाले इसी प्रकार के "अदृश्य लाभों" को गायब होते देख; और अपने रियल इस्टेट से लेकर बच्चों की बिक्री के धंदों को खोता देख, आनेवाले चुनाव में हर हाल में बीजेपी को हराना चाहते है....

लेकिन इस बात को साफ़ साफ़ कह तो नहीं सकते इसलिए, "लोकतंत्र, सेक्युलरिजम, फ्रीडम ऑफ़ स्पीच, दलित, पिछड़े" आदी चीजे बीजेपी शासन में खतरे में है, वगैरा वगैरा अनापशनाप बाते और हर्जा सराई इन्हें याद आ रही...

कुछ तो शर्म करो जी....

Saturday, August 25, 2018

सनातन साधकांचे भावविश्व आणि त्यामागील व्यावहारिक, वैद्यकीय आणि शास्त्रीय कारणे


----विनय जोशी 

खालील चित्रातील सनातनच्या साधिकेला आलेले अनुभव आधी वाचु आणि मग यामागची मानसिकता समजुन घेण्याचा प्रयत्न करू...

"दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ
‘काही दिवसांपूर्वी मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. मला ‘माझा तोंडवळा, डोके आणि कान यांवर पुष्कळ आवरण आले आहे’, असे जाणवत होते. मला काही सुचत नव्हते. नामजप करतांना मन एकाग्र होत नव्हते. पुष्कळ जडपणा जाणवायचा. देवानेच मला दैनिक सनातन प्रभातने आवरण काढण्याचे सुचवले. मी तसे आवरण काढू लागल्यावर मला पुष्कळ जांभया येऊन हलकेपणा जाणवू लागला."

वरील लिखाण दादा कोंडकेंच्या सिनेमातील द्वैयर्थी डायलॉग ची आठवण करून देतं. दादा कोंडकेचं पाकीट बाजारात मारलं गेल्यावर दादा म्हणतो, "एय... माझं बाकी काय पन मार, पन पाकीट मारू नको!" वरील तथाकथित अनुभव कथनात बातमीचं शीर्षक एक भयंकर अर्थ पोचवत आहे आणि खालील वर्णन त्याला पुरक संदेश देतोय...

सनातनचे साधक ज्या पराकोटीच्या अगम्य आणि भावनिक भाषेत सगळ्यांजवळ बोलतात आणि लिहितात त्याला अनेक व्यावहारिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. त्यांची भाषा आणि त्यातील विसंगत, अशास्त्रीय, तर्कहीन, आचरट गोष्टी आणि दावे ऐकून अनेक जण यथेच्च टिंगल करतात. पण हा एक सामुहीक आजार आहे. आणि त्याला अनेक कंगोरे आहेत. या साधकांच्या मानसिक स्थितीचा आपण सहानुभुतीने विचार केला पाहिजे. तुम्ही या मताशी सहमत असलंच पाहिजे अशी अट नाही पण वाचुन बघु शकता...

साधारणपणे दिवसभराची धावपळ झालेला माणुस दमुन भागुन घरी परत येतो त्यावेळी लहान सहान गोष्टींवरून तो चिडचिड करतो. दिवसभराच्या कष्टांनी शरीरातली उर्जा संपत आलेली असते आणि मन थकलेलं असतं. अशावेळी त्या माणसाची सगळ्या जगाबद्दल तक्रार असते. प्रत्येकाच्या बाबतीत रोज असे काही क्षण येत असतात; पण काहींच्या आयुष्यात दिवसाचा प्रत्येक क्षण हा निराशाजनक आणि दिशाहीन असतो, असं का असतं?

असं असण्यामागे अनेक कारणे आहेत. अनेक आजारांनी त्रासलेलं शरीर, अस्थिर कौटुंबिक वातावरण, लैंगिक, शारीरिक सुखांची/भावनांची पुर्तता नं होणे, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, व्यावसायिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य नं होणं,  कोणतेही विशेष गुण अंगात नसल्याने समाजात किंमत नसल्याची मानसिकता, काहीतरी वेगळं करून लोकांचे लक्ष आकर्षित करण्याची भुक, अनेक दिवस चांगली झोप नं झाल्याने भ्रमिष्ट झालेले मन, सांधेदुखी सारखे कधीही बरे नं होणारे किचकट, बोचरे आजार,  रक्तामधील सोडीयमचं प्रमाण सतत कमी असणं (Hyponatremia) वगैरे वगैरे... 

आपल्या माहितीत असलेल्या सनातनच्या साधकाचं वरील निकषांवर विश्लेषण केल्यास यातील तथ्य समोर येईल.

कुठल्याही समाजात अशा आणि अन्य अनेक प्रकारच्या समस्या प्रचंड प्रमाणात असतात. त्यामुळे अशी माणसे त्यातुन बाहेर पडण्याचा राजमार्ग शोधत असतात. नेमक्या त्याच वेळी सनातन सारखे; व्यावहारिक अडचणींना तथाकथित राष्ट्रीय, आध्यात्मिक, आक्रमक विचारांचं कोंदण देणारे सापडले की वर वर्णन केलेल्या प्रकारातले सर्व मानसिक, व्यावहारिक, शारीरिक रोगी तिकडे आकर्षित होतात. आणि शीर्षस्थ लोक; जे प्रचंड धुर्त आणि स्वार्थी असतात ते याचं "मानसिक" शोषण करून त्यांना वाटेल त्या दिशेला अलगदपणे वळवतात.

पाश्चात्य देशात अशा चमत्कारिक पंथांच्या (मिस्टिक सेक्टस) नादाला लागुन एकाच ठिकाणी जमुन अनेकांनी सामुहीक आत्महत्या केल्याची उदाहरणे चिक्कार घडली आहेत. नुकतीच दिल्ली जवळ बुराडी येथे अशीच एका कुटुंबाने आत्महत्या केली. जे आत्महत्या करू शकत नाहीत आणि ज्यांना सनातन सारखा आपल्या दबलेल्या आकांक्षांना वाट मोकळी करून देणारा एक "व्हॉल्व" उपलब्ध होत नाही ते अमेरिकेत बंदुक विकत घेऊन मॉल/रस्ता/शाळा अशा ठिकाणी जाऊन गोळीबार करून पळतात किंवा आत्महत्या करतात.

सनातन सारख्या व्यवस्था कदाचित अमेरिकेत निर्माण झाल्या तर अशी सामुहीक हत्याकांडे थांबवु शकतील, कारण त्यांना व्यक्त व्हायला एक हक्काचं व्यासपीठ मिळेल (ह्या दाव्यावर मोठा वाद होऊ शकतो)!

लैंगिक गरजांची योग्य मार्गाने पूर्तता नं होणं ही भारतीय समाजात आढळणारी अजुन एक मोठी; (कदाचित) सर्वात मोठी समस्या आहे. याचा लग्न होणे किंवा नं होणे याच्याशी काहीही संबंध नाही. वरील उदाहरण अशाच प्रकारचे आहे अशी शक्यता वाटते. भारतीय समाजात लैंगिक संबंधांना एका किळसवाण्या नजरेतुन बघितलं जातं आणि पाश्चात्य जगात त्याला नको तितकं मोकळं रूप दिलं जातं. याचा सुवर्णमध्य गाठला गेला तर सनातन सारख्या संस्थांची अर्धी भरती बंद होईल अशी पक्की खात्री वाटते.

दुर्दैवाने बाहेर आध्यात्माचे कवच लाऊन अशा लैंगिक गरजांची कोंडी झालेल्यांवर ताव मारायला अनेक बंगाली बाबा- रहीम बाबा टपलेले आहेतच. अशा कुंठीत लोकांच्या गरजा भागवुन त्याला सतत अतर्क्य विश्वात रममाण ठेवलं की एकीकडून गरजाही भागतात आणि दुसरीकडून त्याचा बभ्रा होण्याची भीती नाही असा दुहेरी फायदा यात आहे.

सनातन मध्ये "लैंगिक शोषण" झाल्याची एकही तक्रार बाहेर आलेली नाही, पण ज्या पद्धतीने आश्रम नावाचे  "घेट्टो" सनातनने उभे केले आहेत आणि ज्या पातळीचे मानसिक भ्रम असलेले लोक तिथे राहतात त्यावरून कसलीही शक्यता नाकारता येत नाही. 

सनातनची सुरुवात "दुर्जनांच्या नाशासाठी" या घोषणेने झाली आणि पुढे ती "हिंदुराष्ट्राची स्थापना" इथपर्यंत पोचली. पहिल्या घोषणेत "महम्मद पैगंबर',"येशू ख्रिस्त" वगैरे उच्चकोटीचे धर्मात्मे होते, परंतु या घोषणेला पब्लिक अपील मिळत नसेल म्हणा किंवा "हिंदुत्व"एक चलनी नाणं आहे हे निष्णात "मानसोपचार तज्ञ" असलेल्या सनातनच्या संस्थापकांना लक्षात आलं असेल म्हणा त्यांनी दुसऱ्या घोषणेच्या आधारे सनातन मोठ्या पल्ल्यावर पोचवली... त्यामुळे आता ती तिसऱ्या आणि सर्वात आकर्षक घोषणेच्या तयारीला लागु शकते...

सनातनची तिसरी घोषणा काय असू शकते? 

ओशो रजनीश यांनी "संभोग ते समाधी" अशी घोषणा दिली, याचा अर्थ जीवनाच्या निर्माणासाठी लागणाऱ्या कृतीपासून ते शेवटची स्थिती समाधी पर्यंत. पण त्यांच्या धुर्त अनुयायांनी "संभोग ते समाधी" याचा अर्थ "संभोगातुन समाधीकडे" असा लाऊन घेतला आणि त्याला "सेक्स ऑर्जी" चं स्वरूप दिलं.

येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा राजकीय वापर कमी होऊन तो "विकास, विकास और विकास" असा झाल्यास सनातन शुद्ध भौतिक घोषणा देईल आणि ती "संभोगाद्वारे समाधी" या घोषणेशी मिळती जुळती असेल.... आणि कॅथोलिक चर्चसारख्या "मॅग्दालीन लाउंड्रीज" इथेही बनलेल्या दिसतील...

म्हणुन सनातनकडे एक "सामाजिक आजार" म्हणुन दयाळु नजरेने बघुया, त्यात फसलेल्या बंधु-भगिनींना योग्य वैद्यकीय उपचार मिळतील असं बघुया आणि खऱ्या हिंदुत्वाची सेवा करून "हिंदु राष्ट्राचं" स्वप्न साकार करायला हातभार लाऊया...



Friday, August 24, 2018

आयर्लंडची कॅथोलिक बलात्कार गृहे आणि अर्भकांची सामुहिक दफनभूमी!

आयर्लंडची कॅथोलिक बलात्कार गृहे आणि अर्भकांची सामुहिक दफनभूमी!

-विनय जोशी 

पोपच्या दौऱ्याने कॅथोलिक चर्चच्या लैंगिक पापी इतिहासाला परत एकदा वाचा फुटली!

आयर्लंडच्या कॅथोलिक चर्चने महिला आणि मानवतेवर ज्या प्रकारे अत्याचार केले त्याला जगात तोड नाही. या सगळ्याच्या मुळाशी होत्या  "मॅग्दालीन लाउंड्रीज", ज्याच्या आड बंदिस्त महिलांवर अमानुष लैंगिक अत्याचार केले गेले आणि त्यांच्यापासुन झालेली तान्ही मुले बळजबरीने आईपासुन तोडुन अज्ञात लोकांना दत्तक दिली गेली. कॅथोलिक चर्चचा हा अमानुष धंदा कित्येक वर्ष बिनबोभाट चालु होता. पोपच्या आयर्लंड दौऱ्याच्या निमित्ताने त्याला परत एकदा वाचा फुटली आहे.

पोपच्या आगामी आयर्लंड दौऱ्याची तिकिटे/पासेस घेऊन तिथे नं जाता निषेध नोंदवण्याचे आंदोलन जोर पकडत आहे. कॅथोलिक चर्चने गेल्या शेकडो वर्षात आयरिश महिला आणि मुलांवर केलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल लोकांच्या मनात तीव्र संताप आहे. १९९६ ला शेवटची  महिला "मॅग्दालीन लाउंड्रीज" मध्ये पाठवली गेली आणि त्यानंतर एका ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम करताना २०० अर्भकांचे मृतदेह पुरले गेल्यानंतर लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड संताप उफाळुन येऊन हे प्रकार बंद झाले. तरीही निर्लज्ज कॅथोलिक चर्चने आजपर्यंत "मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील एकाही पिडीत महिलेला नुकसानभरपाई दिलेली नाही! आणि याबद्दलच लोकांच्या मनात कॅथोलिक चर्च बद्दल संताप आणि राग आहे.

अठराव्या शतकात "चारित्र्यहीन" स्त्रियांना शिक्षा म्हणून यात आणुन कोंबायला सुरुवात केली गेली. "चारित्र्यहीन" महिला कोण हे चर्चचे पाद्री ठरवू लागले. जी सुंदर आणि भोगायला उत्तम ती "चारित्र्यहीन" ठरवली जाऊ लागली. एकदा तिच्यावर हा शिक्का पडला कि ती "मॅग्दालीन लाउंड्रीज" मध्ये आणुन टाकली जायची. आयर्लंडची न्यायालये सुद्धा लहान सहान गुन्ह्यासाठी महिलांना असल्या भयानक तुरुंगात पाठवु लागली.

विशेष म्हणजे धार्मिक गुप्ततेच्या नावाखाली आजपर्यंत एकूण किती महिला यात कोंबून ठेवल्या गेल्या, कितींवर बलात्कार झाले, किती अर्भके मेली आणि किती आपल्या आयांपासून वेगळी करून समाजात दत्तक दिली गेली याची कुठेही नोंद नाही! यातील महिलांना शिस्तीच्या नावाखाली संपूर्ण दिवसभर मौनात राहावे लागत होते! आपण कल्पनाच करू शकत नाही, की जी महिला बाह्य जगापासुन वेगळी केलेली आहे तिच्या वाट्याला काय काय आलं असेल आणि स्वतःचं तान्हं बाळ कुणी हिसकावून नेल्यावर बंदिस्त बाईच्या मनाचं काय झालं असेल!

पोपच्या या दौऱ्याच्या दिवशीच तुआम या ठिकाणी एका शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याच ठिकाणी एक कॅथोलिक माता आणि बालगृह होते आणि तिथेच ८०० अर्भकांचे पुरलेले मृतदेह मिळाले होते. अत्यंत किळस आणणारा प्रकार आहे हा सगळा!

"मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील महिलांना मोठ्या आंदोलनानंतर आयर्लंड सरकारने नुकसानभरपाई भरपाई दिली पण गेंड्याच्या कातडीचं आणि पैश्याच्या राशी असलेलं कॅथोलिक चर्च अजुनही या बाबतीत अजिबात कान हलवत नाही...

हे वाचुन यापुढे हिंदी सिनेमातल्या पांढरा डगळा घातलेल्या दयाळु-कनवाळु-मायाळु फादर किंवा सिस्टरच्या प्रतिमेवर ठेवाल विश्वास?

कॅथोलिक चर्च हे पाप, अत्याचार, गुन्हेगारी, गुंडगिरी, भ्रष्टाचार, दमन, रक्तपात याचं सामनार्थी नाम आहे....

उघडा डोळे....

आणि लोकांचे उघडायला मदत करा....


सनातन- कॉंग्रेस-राष्ट्रवादी मॅच फिक्सिंगचे पुरावे!



---- विनय जोशी

सनातन संदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना मवाळ होते आणि आता आक्रमक झाले असं "लोकसत्ता" म्हणतोय!
पवार साहेबांचं यात काय बरं गणित असेल? गृहखातं १५ वर्ष सलग राष्ट्रवादीकडेच होतं.....
सनातनवर संशय त्याच गृहखात्याचे पोलीस घेत होते......
त्यांचेच आमदार विधानसभेत सनातनवर बंदीची मागणी करत होते......
त्यांचंच राज्य सरकार त्यांच्याच केंद्र सरकारला सनातनवर बंदी घालण्याची लेखी शिफारस करत होतं.....

मग... माशी शिंकली कुठे?

सनातन नावाची "गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडुन खाल्ली" हे धोरण कुणाच्या सुपीक डोक्यातुन बाहेर आलं? सनातनला सुखाने वाढू द्यायचं आणि त्याच्या मार्फत संघाला मागे रेटता येईल तेवढं रेटायचं हे धोरण सलग १५ वर्ष राष्ट्रवादीने मस्त राबवलं.

२००४ ला कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत आली आणि ५ जुन २००८ ला "आम्ही पाचपुते" नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये एक स्फोट झाला. या नाटकात हिंदू देवतांची बदनामी केलेली आहे म्हणुन स्फोट घडवण्यात आला अशी कबुली सनातनचे साधक रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांनी पोलिसांजवळ दिली, खटला चालुन ३० ऑगस्ट २०११ ला या दोघांनाही १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.

यानंतर पुढे पुर्ण ३ वर्षे महाराष्ट्रात आणि देशात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात होतं. बॉम्बस्फोटाच्या खटल्यात ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली त्या संघटनेवर बंदीसाठी सबळ पुरावे नाहीत असं कॉंग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री का म्हणत होते आणि महाराष्ट्राचं गृहखातं गप्प का बसुन होतं?

कारण संघ संबंधित संस्थांना मागे रेटण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीला एक मजबूत मोहरा हवा होता.

महाराष्ट्राच्या लहान लहान गावात प्रचंड मोठे हिंदु मेळावे आणि त्यात आक्रमक धार्मिक भाषणे, शस्त्र प्रशिक्षणे आणि युवकांना खेचण्याचे भावनिक कार्यक्रम सतत चालु होते. केंद्रीय गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी ऑडीओ रेकॉर्डिंग डिव्हायसेस घेऊन अशा कार्यक्रमांना नियमित उपस्थित राहत होते. त्यातुन सरकारने काहीच बोध घेतला नव्हता का?

आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी सनातनच्या नावाने कितीही बोंबलो खुद्द सनातनला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना याची चांगली जाणीव आहे की सनातन कशासाठी वाढू दिली गेली आणि आता तिच्यावर बंदीची मागणी कशाबद्दल केली जात आहे....

मांजर डोळे मिटून दुध पितं आणि आपल्याला कोणीही बघत नाहीये असं समजत राहतं... तीच अवस्था सनातन- कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची आहे....
तेव्हा कुणालाच मुर्ख बनवायला जाऊ नका....

कळलं???? का अजुन मोठ्याने बोलु???

Image may contain: 6 people, including Nayan Chowdhury Nayan, text

No automatic alt text available.


Thursday, August 23, 2018

सनातन आणि संघ संबंध- कोण चुक,कोण बरोबर?

सनातन आणि संघ संबंध- कोण चुक,कोण बरोबर?

---- विनय जोशी
काही दिवसांपुर्वी प्रकाशित झालेल्या "सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती? शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!" या लेखावर सनातनच्या एका साधकाने मुंबई तरुण भारतला एक लंबे चौडे पत्र लिहुन हिंदु संघटनांनी मतभेद विसरून एकत्र काम का आणि कसे केले पाहिजे याचे उपदेश दिले. लेखाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! पण या लेखाचा प्रतिवाद केल्यामुळे सनातनच्या टोकाच्या संघद्वेषाकडे दुर्लक्ष नक्कीच करता येणार नाही. त्यामुळे संघाने सनातन सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर सनातनने कसा प्रतिसाद दिला याची चर्चा होणे आवश्यक आहे.
संघाचा सनातन सोबत संपर्काचा प्रयत्न....
सन २०००- २००१ च्या आसपास सनातन अतिशय वेगाने वाढत होती. सनातनचा सगळा प्रचार हिंदु हित आणि हिंदु संघटन याच्या अवतीभोवती फिरत होता. अर्ध्या बाह्यांचे पिवळे अॅप्रन घातलेले साधक गोव्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी अत्यंत मनःपुर्वक सनातनची प्रचार सामग्री वाटत फिरायचे. सुरुवातीच्या काळात "उदबत्ती देवतेने मार्गदर्शन करणे", "प.पु. आठवले गुरुजींनी वापरलेल्या कमोड मधील पाणी गंगाजलासमान पवित्र मानुन ते प्राशन करणे", "आध्यात्मिकतेची पातळी ३०% वरून ९५% होणे" वगैरे आचरट प्रकार सनातनने सुरु केले नव्हते किंवा निदान तसे छापले जात नव्हते.
सनातनची चर्चा संघ स्वयंसेवकांमध्ये जोरात होती. आणि या नवीन संघटनेत नेमके कोण लोक आहेत, त्यांचा नक्की उद्देश काय आहे हे जाणुन घेण्यासाठी मुंबईमधील एक अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी संघप्रचारकांनी त्यांच्या एका सहकारी प्रचारकाला सनातनच्या नेतृत्वाची भेट घ्यायला सांगितली. त्यानुसार ते संघ प्रचारक सनातनच्या पनवेल आश्रमात गेले. त्यांच्या आश्रमातील साधकांसोबत गप्पा झाल्या. पण काहीतरी गडबड लक्षात आल्यामुळे त्या संघप्रचारकांनी तिथे असलेल्या पत्र संपादकाला बोलता बोलता असं सांगितलं, की ही भेट अनौपचारिक आहे आणि यासंदर्भात एवढ्यात काहीही नं छापलेलं बरं. त्यावर त्या संपादक महोदयांनी सांगितलं, "गुरुजींची शिकवण आहे, सत्य लपवू नये!"
दुसऱ्याच दिवशी सनातनच्या अंकात संघप्रचारकांच्या आश्रम भेतीवरील साद्यंत वृत्तांत सनातनने छापला! "या भेटीसंदर्भात काहीही छापु नये, अशी विनंती त्यांनी केली यासह छापला!" आणि वर एक बलाढ्य हिंदु संघटना सनातनच्या दारात, अशी शेखी सुद्धा मिरवली!
अशा लोकांच्या वाटेस जाईल कोणी परत?
नंतर सनातनवर बंदी घालणं वगैरे मागण्या उठु लागल्यावर सनातनचे डोळे खाडकन उघडले आणि दिल्लीमधील संघप्रचारकांना भेटण्यासाठी सनातनचे दूत दिल्लीला गेले, पण आधी एका अनौपचारिक भेटीचा सनातनने जो काही राडा केला होता तो अनुभव लक्षात घेऊन संघाने त्यांच्याकडे साफ साफ दुर्लक्ष केलं.
पुढे सनातनला संघासंबंधात एक अतिशय गुप्त (???) आणि संवेदनशील(????) माहिती हाती लागली. ती बातमी अशी की संघ नेतृत्वाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय. कडून काही कोटी रुपये घेतले! सत्यावर अढळ विश्वास असल्याने सनातनने ही बातमी मीठ मसाला लाऊन त्यांच्या अंकात छापली! यामुळे संघकार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला. अशाप्रकारे सनातनने भविष्यात संघाजवळ चांगले संबंध निर्माण करण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद करून टाकले.
इथून पुढे सनातनच्या पेपरात आणि सर्व लिखाणात पराकोटीचा संघद्वेष उफाळून येऊ लागला. हिंदू हित आणि राष्ट्रीयता या संदर्भात पहिल्या पानावर बातमी छापायची आणि त्याला कंसात तळटीप देऊन, संघाचे बेगडी हिंदुत्व अजुन किती काळ हिंदुंची फसवणुक करणार? वगैरे ज्ञानामृत पाजणारा मजकूर लिहायचा, ही सनातनची सवय बनुन गेली.
नंतर हिंदुविरोधी लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या लोकांच्या फोटोंवर सनातनच्या वेबसाईटवर लाल रंगाच्या फुल्या मारण्याचे उपद्व्याप सुरु झाले. मग सुतली बॉम्बस्फोट वगैरे वगैरे सगळे प्रकार सुरु झाले. आणि त्यात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी संघाने पुढे यावं अशी अपेक्षा सनातन पेपरमधून व्यक्त करू लागला. ज्या संघाला उठता बसता सनातनने दोष दिला, वाट्टेल ते गरळ ओकलं आणि शिवाय आतंकवादाचे थेट समर्थन केलं त्यांच्यासाठी संघाने स्वतःची प्रतिष्ठा पणाला का लावावी? संघालाही मालेगाव स्फोटात अडकवण्याचा प्रयत्न झालाच पण त्यात जंगजंग पछाडून कॉंग्रेस काहीही करू शकली नाही. सनातनने आपली विश्वासार्हता पुर्णपणे गमावलेली असल्याने डोकं शाबूत असलेले आणि हिंदु हिताची खरी तळमळ असलेले लोकसुद्धा त्यांच्यापासुन दुरावले. तर संघ कुठली साथ देणार?
सनातन संघावर टीका का करतो?
ज्या व्यक्तीची जागा दुसऱ्या व्यक्तीला घायची असते तिच्यावर टीका केली जाते असा नियम आहे. उदाहरणार्थ; राहुल गांधी रोज नं चुकता मोदींवर टीका करतात, का? ते जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यावर टीका का करत नाहीत? तर गांधींना मोदी सध्या ज्या खुर्चीवर बसले आहेत ती खुर्ची हवी आहे, म्हणून त्यांच्यावर टीका, शिंझो आबेवर टीका करून त्यांना दिल्लीची खुर्ची कशी मिळणार? तसंच सनातनला संघाचा "बलाढ्य हिंदु संघटन" हा मान मिळवायचा आहे, त्यामुळे संघ हिंदु हितासाठी काहीही करत नाही हे सिद्ध करणे सनातनच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे मिळेल त्या मुद्द्याला आधार मानुन सनातन हे काम करत असते.
सनातनचा दावा असा आहे, सावरकर आणि गोळवलकर यांच्यातही मतभेद होते आणि हिंदु हितासाठी काम करणाऱ्या संघटनांत मतभेद आहेत त्यामुळे प्रामाणिक टीका होऊ शकते. मी हा तर्क कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. सावरकर आणि गोळवलकर यांच्यातील मतभेदांची सनातन संघ मतभेदाशी तुलनाच होऊ शकत नाही. ह्या दोन व्यक्ती अतिशय उच्च दर्जाच्या आणि बुद्धिमान होत्या. सनातन आणि संघात उत्तर-दक्षिण ध्रुवाएवढं अंतर आहे. सनातनचा "प्रामाणिक टीकेचा" तर्क अतिशय दिशाभूल करणारा आहे, संघ प्रमुखांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका याला सनातन प्रामाणिक टीका म्हणणार का?
संघ प्रमुखांवर सनातनने केलेले धादांत असत्य आरोप हे त्यांनी केलेला "सुपारी किलिंग" चा प्रकार होता आणि महाराष्ट्रातील संघ विरोधी राजकीय पक्षांचा त्याला सक्रीय पाठींबा होता.
उत्तरात सनातनने विचारले आहे, "संघ-सनातन वेगळे आहेत हे दाखवण्याची घाई कसली?" यावर एवढंच म्हणू शकतो की हे वेगळेपण दाखवण्याची संघाला गरज नाही कारण ते सनातनची प्रकाशानेच नित्य नियमाने दाखवत असतात. "काळी जादू काढण्यासाठी पायाच्या नखापासून कपाळापर्यंत गंध आणि स्टीकर लावणे", "स्वप्नात अनेक गुंडांनी घेरल्यावर, जप सुरु केल्यावर त्या गुंडांचा स्फोट होणे", "सात्विकतेची पातळी जपानंतर एका दिवसात ४५% वरून ९०% वर जाणे" आणि इथे लिहिता नं येणारे असंख्य प्रकार हेच सनातन संघापेक्षा वेगळा आहे हे सिद्ध करत असतात...
सनातनने समाधानासाठी स्वतःला संघापेक्षा उच्च पातळीचं मानावं, त्याने संघाला काय फरक पडतो? पण "प्रामाणिक मतभेद" वगैरे नाटकी भाषा वापरू नये कारण सनातन संघाचा द्वेष करते आणि संघाला प्रतिस्पर्धी मानते यात तिळमात्र शंका नाही! त्यामुळे सनातनवर टीका करणाऱ्यांना "निधर्मी" लोकांच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे.
सनातन आणि संघ यांची सिद्धांत,रचना, धोरणं, प्राथमिक बैठक, कार्यपद्धती आणि विचार यात जमीन आसमानाचा फरक आहे.
सनातनचे साधक बनुन घरदार सोडुन आश्रमात जाऊन राहणाऱ्या अनेकांच्या प्रॉपर्टी गायब झाल्या आहेत. असं एकही उदाहरण नाही हे म्हणण्याची हिम्मत सनातनमध्ये आहे? तिथे उच्च प्रतीचे "Psychological Manipulation" आणि लोक भ्रमिष्ट झाल्यासारखे बरळतात, असं आम्ही नाही साधकांचे नातेवाईक म्हणतात.
तेव्हा तत्कालीन आकर्षक विषयांना धरून स्वतः आंदोलन करून संघ ते करत नाही म्हणून संघाला आरोपीच्या उभं करायचं हे धंदे सनातन जेवढ्या लवकर बंद करेल तेवढं लवकर त्याचं भलं होईल...


Tuesday, August 21, 2018

नवबौद्धांनी ख्रिश्चन होण्याचे फायदे आणि चर्चचे समानतेचं सफेद झूट!


Image may contain: one or more people and text
Times of India- Caste discrimination in Kerala relief camp, district collector orders probe
नवबौद्धांनी ख्रिश्चन होण्याचे फायदे आणि चर्चचे समानतेचं सफेद झूट!



Image may contain: text
All India True Christian Council- AITCC
हिंदु दलित आणि तथाकथित मागासवर्गीयांना साफ खोटं सांगुन ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करायचं! एकदा तुम्ही ख्रिश्चन झालात की मग आपण सगळे समान होऊ, जातीय भेदाभेदांचा त्रास तुम्हाला होणार नाही असं खोटं आश्वासन द्यायचं आणि प्रत्यक्षात त्यांच्याशी अत्यंत घाणेरडा व्यवहार करायचा ही चर्चची मुलभूत कार्यपद्धती आहे.

केरळच्या पुरात समाजाच्या सर्व थरातील लोकी भरडले गेले आहेत. मदत शिबिरे चालवताना जातीपातीचा विचार कुणाच्याही मनाला शिवलेला नाही. पण ख्रिश्चनांनी मात्र दलितांनी शिजवलेलं अन्न पूर मदत केंद्रात खायला नकार देऊन आपले खरे रंग जगाला दाखवले. केरळच्या अल्ल्लपुझ्झा जिल्ह्यातील ही घटना गेल्या महिन्यात घडलेली आहे. मदत केंद्रात राहणाऱ्या दलित बांधवांनी तक्रार केल्यावर सरकारी अधिकाऱ्यांनी याची चौकशी सुरु केली आहे. 
आणि यापूर्वी मे महिन्यात केरळमध्येच केविन जोसेफ नावाच्या दलित ख्रिश्चन तरुणाने सवर्ण ख्रिश्चन मुलीसोबत लग्न केले म्हणून केरळच्या उच्च वर्णीय ख्रिश्चनांनी स्थानिक कम्युनिस्ट नेत्यांच्या मदतीने केवीनची हत्या केली. चर्चने  आजपर्यंत एक शब्द काढलेला नाही. 

चर्चचे जातीपाती आणि भेदभाव विरहित समाजाच्या निर्मितीचं आश्वासन किती खोटं आहे आणि चर्च आतून बाहेरून कसा जातीयवादी आहे हे सिद्ध करणाऱ्या शेकडो घटना रोज घडत असतानाही बामसेफचे वामन मेश्राम यांच्यासारखे नेते चर्चच्या अत्यंत कुटील कारस्थानाला बळी पडत आहेत, ते कसे आता बघु

ऑल इंडीया ट्रू ख्रिश्चन कौन्सिलने १२ ऑगस्ट २०१८ ला राष्ट्रीय ख्रिश्चन मेळावा आयोजित केला होता. याला भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम आणि राष्ट्रीय ख्रिश्चन मोर्चा प्रभारी विलास खरात यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याचा उद्देश बहुजन समाजाला जागृत करणे हा होता. पण कशाबद्दल याचा उल्लेख कार्यक्रम पत्रिकेत नव्हता. यात जाऊन मेश्राम साहेबांनी काय मार्गदर्शन केले याचा उल्लेख नंतर सापडला नाही. मेथॉडीस्ट चर्चचे धर्मगुरू रेव्हरंड शमुवेल यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. 

भारतातील जातीजातींना एकमेकांविरुद्ध लढवून त्यातील दुबळ्या जातीचा आधी घास घ्यायचा आणि दुसरे ख्रिश्चन डेनॉमिनेशन दुसऱ्या जातीच्या मागे उभे करून मग त्या जातीचा घास घायचा. नंतर दोन्ही जातीत भीषण संघर्ष पेटवून दोन्ही बाजुंनी त्यात मध्यस्थी करायची आणि शांती स्थापनेचे "क्रेडीट" चर्चच्या खिशात टाकायचा हा धंदा चर्च गेली १५० वर्षे खेळत आहे. 


भारताच्या नॉर्थ ईस्टमध्ये कार्बी-डिमासा संघर्ष, नागा-कुकी दंगे, राभा-गारो रक्तपात हे आणि असे अनेक रक्तरंजित संघर्ष चर्चने घडवून आणले आहेत. त्यात दोन्ही बाजुंनी चर्चनेच मध्यस्थी केली आणि वर क्रेडीट सुद्धा लाटलं!

आता हाच प्रयोग चर्च उर्वरित भारतात करू इच्छीत आहे.  वामन मेश्राम यांच्यासारखे भोळे भाळे नेते या बदमाश चर्चच्या जाळ्यात अलगदपणे सापडले आहेत. मेश्रामांच्या कोणत्याही भाषणात त्यांच्या आत हिंदु धर्माविषयी किती विखार भरलेला आहे ते जाणवतं पण तो कुणी भरला आहे हे मात्र खालील बातमी वाचल्यावर समजलं! 

ऑल इंडीया ट्रू ख्रिश्चन कौन्सिलने आयोजित केलेल्या मेळाव्याचा उद्देश बहुजन समाजाला जागृत करणं हा बिलकुलच नाही, त्याचा उद्देश नवबौद्धांना ख्रिश्चन करणं हाच आहे. आधी शेकडो देवतांना मानणाऱ्या (Polytheist) हिंदू जाती एकदेवत्व मानणाऱ्या बौद्ध धर्मात परावर्तित झाल्या आता त्या अशाच दुसऱ्या एकदेवत्व (Monotheist) मानणाऱ्या ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित होणं ही तुलनेने सोपी प्रक्रिया आहे. 

नवबौद्धांनी ख्रिश्चन होण्याचे फायदे काय? 

एकदा का नवबौध्द बांधव ख्रिश्चन झाले की, चर्चची "कथनी" आणि "करणी " यात किती फरक आहे याचा प्रत्यक्ष अनुभव वामन मेश्राम यांच्या सारख्या सर्व भोळ्या भाळ्या नेत्यांनी येईल. 

शिवाय चर्चचा उद्देश ख्रिश्चन झालेल्या लोकांच्या आत्म्यांना मोक्ष मिळवून देणं हा नसुन सर्व नव-ख्रिश्चनांचे मिळतील ते सर्व "रिसोर्सेस" गिळंकृत करणे हा आहे हे हे कटू सत्य समस्त बहुजन नेतृत्वाला कळून चुकेल. 

मनुवाद्यांकडुन आणि हिंदुत्त्ववाद्यांकडून "संविधान" आणि बहुजन समाजाला धोका आहे अशी बोंब मारणारे ख्रिश्चन अर्थात चर्च स्वतः किती निर्लज्जपणे संविधानाला पायदळी तुडवते हेही आमच्या भोळ्या बहुजन नेतृत्वाला कळेल.  गेल्या वर्षभरात कॅथॉलिक चर्चने कमीत कमी ४ वेळा राष्ट्रवादी संघटना आणि हिंदुत्ववादी यांच्याकडून दलित, ट्रायबल्स, अल्पसंख्य आणि संविधान यांना धोका असल्याची आरोळी ठोकली आहे परंतु प्रत्यक्षात चर्चनेच गेल्या ७० वर्षात पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाची उघड उघड हेटाळणी केली आहे. संविधानाच्या पाचव्या शेड्युल अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र, छत्तीसगढ, झारखंड, बिहार, ओरिसा, आंध्र येथील आणि संविधानाच्या सहाव्या शेड्युल अंतर्गत येणाऱ्या नॉर्थ ईस्ट मधील ७ राज्यातील सुमारे २ लाख एकर जमिनी, ज्या कधीही ट्रायबल्स शिवाय अन्य कुणालाही खरेदी करता येत नाहीत, अशा गिळंकृत केल्या. 
आता सांगा संविधानाला खरा धोका कुणाकडुन आहे? चर्चकडुन का हिंदुत्ववाद्यांकडुन ?

भोळ्या बहुजन बांधवांना मनुवादी, ब्राह्मणवादी, हिंदुत्ववादी अशा विविध राक्षसांची भीती दाखवायची आणि हळूच त्यांना चर्चच्या पदराखाली ओढायचं आणि मग त्यांच्या जागा जमिनी सर्व गिळायचं अशी ही धूर्त चाल आहे.  हा यशस्वी धंदा चर्चने लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आशिया सर्वत्र अतिशय योजनाबद्ध पद्धतीने केला आहे, आता भारतीय बहुजनांचा घास घ्याल चर्चने आपला अक्राळ विक्राळ जबडा उघडला आहे.  

पूज्य बाबासाहेबांनी चर्चचा धोका ओळखुन त्यांना आपल्यापासून चार हात दूर ठेवलं होतं पण सध्याचं नेतृत्व हे वामन मेश्राम, प्रकाश आंबेडकर यांच्यासारखं अत्यंत साधं आणि कमालीचं भोळं असल्याने त्यांना चर्चचा धोका आणि त्यातून बहुजनांची भविष्यात होणारी लुटपाट आणि जबरदस्त शोषण याचा धोका कळत नाही त्यामुळे सध्याचं नेतृत्व आपल्या अनुयायांना अलगदपणे चर्चच्या झोळीत टाकेल आणि येणाऱ्या अनेक पिढ्या याचा दोष सध्याच्या नेतृत्वाला देतील.... 

आणि हे अगदी अटळ आहे....  

त्यामुळे नवबौद्धांनी ख्रिश्चन झाल्याशिवाय चर्चचा खरा चेहरा त्यांना दिसणार नाही म्हणून त्यांनी एकदा प्रत्यक्ष ख्रिश्चन व्हावंच म्हणजे चर्चचे अंतरंग त्यांना दिसतील आणि आपले कोण आणि परके कोण याचाही अर्थ लागेल!


Times of India- Caste discrimination in Kerala relief camp, district collector orders probe
Sajimon P S | TNN | Updated: Jul 22, 2018, 23:03 IST





Add to Google