---- विनय जोशी
सनातन संदर्भात कॉंग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत असताना मवाळ होते आणि आता आक्रमक झाले असं "लोकसत्ता" म्हणतोय!
पवार साहेबांचं यात काय बरं गणित असेल? गृहखातं १५ वर्ष सलग राष्ट्रवादीकडेच होतं.....
सनातनवर संशय त्याच गृहखात्याचे पोलीस घेत होते......
त्यांचेच आमदार विधानसभेत सनातनवर बंदीची मागणी करत होते......
त्यांचंच राज्य सरकार त्यांच्याच केंद्र सरकारला सनातनवर बंदी घालण्याची लेखी शिफारस करत होतं.....
मग... माशी शिंकली कुठे?
सनातन नावाची "गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडुन खाल्ली" हे धोरण कुणाच्या सुपीक डोक्यातुन बाहेर आलं? सनातनला सुखाने वाढू द्यायचं आणि त्याच्या मार्फत संघाला मागे रेटता येईल तेवढं रेटायचं हे धोरण सलग १५ वर्ष राष्ट्रवादीने मस्त राबवलं.
२००४ ला कॉंग्रेस-राष्ट्रवादी महाराष्ट्रात सत्तेत आली आणि ५ जुन २००८ ला "आम्ही पाचपुते" नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये एक स्फोट झाला. या नाटकात हिंदू देवतांची बदनामी केलेली आहे म्हणुन स्फोट घडवण्यात आला अशी कबुली सनातनचे साधक रमेश गडकरी आणि विक्रम भावे यांनी पोलिसांजवळ दिली, खटला चालुन ३० ऑगस्ट २०११ ला या दोघांनाही १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा झाली.
यानंतर पुढे पुर्ण ३ वर्षे महाराष्ट्रात आणि देशात कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार अस्तित्वात होतं. बॉम्बस्फोटाच्या खटल्यात ज्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना सक्तमजुरीची शिक्षा झाली त्या संघटनेवर बंदीसाठी सबळ पुरावे नाहीत असं कॉंग्रेसचे केंद्रीय गृहमंत्री का म्हणत होते आणि महाराष्ट्राचं गृहखातं गप्प का बसुन होतं?
कारण संघ संबंधित संस्थांना मागे रेटण्यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादीला एक मजबूत मोहरा हवा होता.
महाराष्ट्राच्या लहान लहान गावात प्रचंड मोठे हिंदु मेळावे आणि त्यात आक्रमक धार्मिक भाषणे, शस्त्र प्रशिक्षणे आणि युवकांना खेचण्याचे भावनिक कार्यक्रम सतत चालु होते. केंद्रीय गुप्तचर विभाग आणि राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाचे अधिकारी ऑडीओ रेकॉर्डिंग डिव्हायसेस घेऊन अशा कार्यक्रमांना नियमित उपस्थित राहत होते. त्यातुन सरकारने काहीच बोध घेतला नव्हता का?
आता कॉंग्रेस-राष्ट्रवादी सनातनच्या नावाने कितीही बोंबलो खुद्द सनातनला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना याची चांगली जाणीव आहे की सनातन कशासाठी वाढू दिली गेली आणि आता तिच्यावर बंदीची मागणी कशाबद्दल केली जात आहे....
मांजर डोळे मिटून दुध पितं आणि आपल्याला कोणीही बघत नाहीये असं समजत राहतं... तीच अवस्था सनातन- कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची आहे....
तेव्हा कुणालाच मुर्ख बनवायला जाऊ नका....
कळलं???? का अजुन मोठ्याने बोलु???
No comments:
Post a Comment