अटल जींच्या निधनानंतर आमच्या तात्यांनी आपली औकात दाखवुन दिलीच... जे करू नये आणि बोलू नये ते हमखास करणारे दोन लोक भारतात आहेत, एक दिल्लीचा "शहजादा" आणि दुसरा मुंबईचा "पगारी नेता"
परभणीचे लोक अभिमानाने म्हणतात, "जगात जर्मनी-भारतात परभनी!". तसाच हा प्रकार एक दिल्लीचा "जन्मजात नेता आणि हा मुंबईचा पगारी नेता..."
गेल्या वर्षी याच मनुष्याने लाखोंच्या संख्येने, शिस्तीत निघणारे मराठा मूक मोर्चे सर्वत्र आदराचा आणि कुतूहलाचा विषय होत असताना त्या मोर्चांची "मुका मोर्चा" अशी हेटाळणी करणारे; गर्दीत एक महिला आणि एक पुरुष एकमेकांचं चुंबन घेणारे कार्टून त्याच्या पेपरमध्ये छापुन शिवसेनेला मोठ्या अडचणीत आणले होते.
सेनेतून बाहेर पडलेले राणे एकदा या तात्यांना "हा कसला नेता, हा तर पगारी नेता आहे" असं का म्हणाले याची कल्पना यांनी तोंड उघडल्यावर येते.
मुलाखत देताना अतिशय मोठा विद्वान असल्याचा भास निर्माण करण्यासाठी अत्यंत विनोदी पद्धतीने माना हलवत हातवारे करायचे, डोळे एकदा आकाशात नेऊन मग वेगाने नजर खाली आणुन अतिशय उर्मटपणे समोरच्याकडे बघायचं आणि अत्यंत असंबद्ध बोलायचं हेच तात्यांचं क्वालिफिकेशन!
सेनेतल्या जनतेमधून निवडुन आलेल्या लोकप्रतिनिधींना काडीची किंमत नं देता मातोश्रीच्या मर्जीत राहण्याची कला या एकाच भांडवलावर राज्यसभेत जाणारे संजय तात्या. ठाकरेंनी नेमकं काय बघुन आपल्या खास वर्तुळात ठेवलेत ते देव जाणे!
जनतेची फक्त एकंच विनंती आहे, जर काल अटलजींच्या बाबतीत जे काही छापुन सामनाने मागे घेतलं, त्या छापण्याला सेनेच्या नेतृत्वाची मान्यता असेल तर सेनेच्या नेतृत्वाने जयदेव-उद्धव खटल्याची न्यायालयाने इन कॅम्रेरा सुनावणीचे आदेश देण्यासारखं जयदेव नेमकं काय बोलले यावर सुद्धा सामनामधून एकदा लिहावं!
आहे हिंमत?
No comments:
Post a Comment