Wednesday, September 19, 2018

कॅथॉलिक चर्चच्या हॉलंड मधील सेक्स स्कँडलने मोठे वादळ


Image may contain: 1 person

कॅथॉलिक चर्चच्या हॉलंड मधील सेक्स  स्कँडलने मोठे वादळ 

--- विनय जोशी 

एका बाजुने भारतात एका बलात्कारी कॅथॉलिक बिशपला वाचवण्यावरून गदारोळ उडालेला असताना, जगभरात एखाद्या ढगफुटीसारखी कॅथॉलिक सेक्स स्कँडल्स बाहेर येत आहेत. पोपच्या आयरलँड दौऱ्याच्या वेळी कट्टर कॅथॉलिक समाजाने त्यांच्या सर्वोच्च धमर्गुरूंच्या यात्रेवर घातलेला कडकडीत बहिष्कार; चिलीमधील पोलिसांचे लहान मुलांचे लैंगिक शोषणाचे गुन्हे लपवले म्हणुन कॅथॉलिक चर्चेसवर मारलेले छापे; फिलिपिन्स या अजून एका कट्टर बहुसंख्य कॅथॉलिक देशाने केलेली ऑस्टेलियन कॅथॉलिक ननची हिंसक डाव्या राजकीय आंदोलनांना फूस लावण्याच्या आरोपाखाली केलेली हकालपट्टी; भारतातल्या पोलिसांनी फुटीरतावादी पथलगडी आंदोलनाला खतपाणी घातलं म्हणुन फादर स्टॅन स्वामीवर दाखल केलेले गुन्हे; रांचीच्या कॅथॉलिक नन्सनी अर्भके विकली म्हणून दाखल झालेले गुन्हे आणि झालेली अटक; आणि खुंटीच्या फादर अल्फोन्सने सामुहिक बलात्कारात मदत केली म्हणुन त्याला झालेली अटक; अशा कित्येक घाणेरडया कारणांसाठी सध्या जगभरातील कॅथॉलिक चर्चेस समाजात चर्चेचे कारण बनली आहेत. 

त्यात भर म्हणुन आता हॉलंडमधील कॅथॉलिक चर्च एका मोठ्या लैंगिक घोटाळ्याच्या केंद्रस्थानी आले आहे. हा घोटाळा १९४५ ते २०१० या मागील ६५ वर्षाच्या मोठ्या कालखंडात पसरलेला आहे आणि डच कॅथॉलिक चर्चचे ३९ म्हणजे निम्म्याहुन अधिक कार्डिनल्स, बिशप्स आणि फादर्स यात या ना त्या निमित्ताने अडकलेले आहेत. डेली एनआरसी नावाच्या डच वृत्तपत्राने या संबंधात रिपोर्ट छापुन आरोपांच्या ओझ्याने आधीच जर्जर झालेल्या कॅथॉलिक चर्चला अजून एक जीवघेणा धक्का दिला. 

या सर्व बिशप्स आणि कार्डिनल्सना अनेक कामुक बिशप्स बद्दल आणि त्यांच्या लैंगिक सवयींबद्दल पूर्ण माहिती असूनही त्यांनी ह्या बदनाम फादर्सना पाठीशी घालुन वेगवेगळ्या चर्चेसमध्ये बदल्या करून पाठवले आणि त्यामुळे त्यांनी अजून शेकडो लहान मुलांना आपल्या वासनेची शिकार केले! 

चर्चच्या या संतापजनक ढिलाईमुळे अनेक दोषी बिशप्स आणि फादर्स कोणतीही शिक्षा नं होता मेले आणि बाकीचे आता आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. आपल्या डोळ्यासमोर आपल्यावर अत्याचार करणाऱ्या माणसाला चर्च नित्यनेमाने प्रमोशन देताना बघुन आणि त्याच्या हातात नवनवे अधिकार येताना बघुन पीडित व्यक्ती आणि तिच्या नातेवाईकांची  होत असेल याची कल्पनाही नं केलेली बरी अशी स्थिती आहे!

याआधी जर्मन वृत्तपत्र स्पिगेलने १९४६ ते २०१४  दरम्यान जर्मन कॅथॉलिक चर्चमध्ये झालेल्या ३६४७ लैंगिक अत्याचाराचा वृत्तांत छापुन चर्चच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली होती. आणि त्याचवेळी अमेरिकेतील पेनसिल्वानिया मधील कॅथॉलिक चर्चच्या ३०० पॅस्टर्सनी अत्याचार केलेल्या १००० लहान मुलांचा वृत्तांत छापुन पोपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. 

चर्च प्रवक्ती डाफन व्हॉन रोजेण्डालचं यावरील संतापजनक उत्तर ऐकायचंय? ती म्हणते अनेक आरोपी बिशप मेले आहेत आणि जे आरोपी जिवंत आहेत त्यांच्या बाबतीत "डच स्टॅटयूट ऑफ लिमिटेशन्स" संपला आहे, त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही! 

"स्टॅटयूट ऑफ लिमिटेशन्स" म्हणजे गुन्हा घडल्यापासून किती दिवसात तक्रार करावी याची मुदत! ती संपल्यामुळे जिवंत बलात्कारी बिशप्स निर्दोष! आहे ना चर्च दयाळु ?

ब्रिगिट्ट किकन नावाच्या एका पिडीत मुलीने मिडीयाजवळ बोलताना तिची विदारक परवड सांगितली. तिच्यावरील अत्याचारणाच्या बाबतीत तिने पोपला पात्र लिहिलं पण त्याला उत्तर आलं नाही. नंतर ती रोमला गेली आणि व्हॅटिकन पोस्ट ऑफिसला प्रत्यक्ष पत्र सुपूर्त केलं पण तुम्हाला "लवकरच" उत्तर दिलं जाईल असं उत्तर तिला मिळालं आणि प्रत्यक्ष उत्तर कधीच मिळालं नाही! मग तिने याबाबत मिडीया जवळ बोलण्याचा निर्णय घेतला. 

ती म्हणते अमेरिकेत कॅथॉलिक चर्चने केलेल्या अत्याचारांबद्दल सर्वच जण बोलतात, पण इथे हॉलंडमध्ये त्यापेक्षा काहीही वेगळं झालेलं नाही. 

एकुणच कॅथॉलिक चर्चने मिडीया, राजकारणी आणि समाजातील प्रभावशाली लोक आपल्या मोहमायेने आपल्याजवळ ओढुन स्वतःची जी प्रतिमा गेल्या कित्येक शतकांत काळजीपुर्वक निर्माण केली होती, ती प्रतिमा गेल्या काही वर्षात पूर्णपणे भंग होताना दिसत आहे. 

कॅथॉलिक चर्चच्या स्वप्रतिमा निर्मितीत चर्चने निर्माण करून वाढवलेल्या वेगवेगळ्या "राईट्स बॉडीज" ची मोठी भुमिका होती, पण भविष्यकाळात त्यांचेही बुरखे फाटून, कॅथॉलिक चर्च जगभरातल्या लोकांच्या नजरेतून पुर्णपणे उतरलेलं दिसेल आणि त्याला जबाबदार केवळ कॅथॉलिक चर्च आणि उन्मत्त, अहंकारी बिशप्स असतील!

No comments:


Add to Google