Thursday, April 28, 2011

जैतापूरला विरोध का? मिलिंद थत्ते

एप्रिल २७,२०११
मिलिंद थत्ते
अणू उर्जा बरी की वाईट? आपल्‍याला खरंच एवढ्या विजेची गरज आहे का? प्रकल्‍प तिथेच कशाला? जपानसारखं आपल्‍याकडे झालं तर काय? अशा अनेक मुद्द्यांवर सध्‍या चर्चा होते आहे. आणि हे सर्व मुद्दे जैतापूरच्‍या निमित्‍ताने बोलले जात आहेत. हे सर्व व्‍यापक विषय आहेत आणि यावर वादचर्चा होऊन जनमत तयार झालेच पाहिजे. पण जैतापूरला माझा विरोध एका अत्‍यंत बेसिक कारणासाठी आहे.

मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी जैतापूरला एक सभा घेतली. त्‍यात प्रकल्‍पबाधित चारही गावांचे लोक मोठ्या संख्‍येने होते. ‘बाहेरचे’ लोक येऊ नयेत, म्‍हणून सरकारने आणि पोलिसांनी पराकोटीचा बंदोबस्‍त केला होता. तरीही श्रोत्‍यांमध्‍ये कोकण बचाव समितीच्‍या कार्यकर्त्‍या वैशाली पाटील दिसल्‍या, म्‍हणून माननीय मंत्री नारायण राणे अस्‍वस्‍थ झाले आणि त्‍यांनी पोलिस अधीक्षकांना बाईंना बाहेर हाकलण्‍याचे आदेश दिले. गावातल्‍या महिलांनी वैशाली पाटील यांच्‍याभोवती कडे केले आणि पोलिसांचा प्रयत्‍न हाणून पाडला. मंचावर बसलेले मंत्री नारायण राणे, त्‍यांचे कर्तृत्‍ववान पुत्र निलेश राणे (हे कुठल्‍या अधिकारात स्‍टेजवर बसले हे मात्र कळले नाही), आणि पृथ्‍वीराज चव्‍हाण हे मात्र ‘बाहेरचे’ नव्‍हते. जैतापूरच्‍या ‘बाहेरचे’ हे लोक जैतापूरचे भविष्‍य ठरवू शकतात, पण शेजारच्‍या जिल्‍ह्यातल्‍या वैशाली पाटील मात्र त्‍या भविष्‍याला विरोध करू शकत नाहीत.

सभेत जैतापूरमधले डॉ. मिलिंद देसाई मंचावर लोकांच्‍या वतीने बोलण्‍यासाठी म्‍हणून गेले. डॉ. देसाई हे काही राजकारणी किंवा सामाजिक कार्यकर्ते नव्‍हेत. ते रीतसर वैद्यकीय प्रॅक्‍टीस करणारे डॉक्‍टर आहेत. मूळचे जैतापूरचेच आहेत. वडीलोपार्जित 100 एकर बागायती आहे. आत्‍ता सरकारने देऊ केलेल्‍या दराने (एकरी दहा लाख रू.) त्‍यांनी आपली जमीन प्रकल्‍पाला दिली, तर ते क्षणात कोट्याधीश होतील. तसे करण्‍याऐवजी हे डॉ. देसाई आपला गाव, आपली जमीन नष्‍ट होणार म्‍हणून प्रकल्‍पाच्‍या विरोधात रस्‍त्‍यावर उतरले आहेत. डॉ. देसाई मंचावरून बोलताना म्‍हणाले की, आम्‍ही सुरूवातीपासून सरकारला सांगतो आहोत आम्‍हाला हा प्रकल्‍प नको आहे. आम्‍हाला आमच्‍या पध्‍दतीने राहू द्या जगू द्या. पण हे सरकार बेशरम आहे.

बेशरम म्‍हटल्‍यावर नारायण राणे आणि त्‍यांचे कर्तृत्‍ववान पुत्र यांचा संताप अनावर झाला आणि त्‍यांनी डॉ. देसाईंच्‍या हातातून माईकच काढून घेतला. डॉ. देसाई काहीही न बोलता मंचावरून उतरले आणि सभेतून निघून गेले. यानंतर एक तरूण कार्यकर्ता मंचावर आला आणि आपल्‍याला बोलू द्यावे अशी विनंती केली. त्‍याने माईक हातात घेतला आणि लोकांना विचारले, ‘तुमच्‍यापैकी ज्‍यांचा प्रकल्‍पाला विरोध आहे त्‍यांनी हात वर करा’. सभेतील सर्व लोकांनी हात वर केले. तो कार्यकर्ता मुख्‍यमंत्र्यांकडे वळला आणि म्‍हणाला, तुम्‍हाला कळले ना आम्‍हाला हा प्रकल्‍प नको आहे, बास् आम्‍हाला दुसरं काहीही बोलायचं नाही. आणि तो मंचावरून खाली उतरला.

सभेनंतर पुढच्‍या 72 तासात पोलिसांनी मध्‍यरात्री दोन च्‍या सुमारास डॉ. देसाई, तो तरूण कार्यकर्ता, यांच्‍यासह सभेत बोलणा-या 12 गावक-यांना अटक केली. आणि दरोडा, खुनाचा प्रयत्‍न असे गुन्‍हे त्‍यांच्‍यावर दाखल केले. ‘आम्‍हाला विरोध करता काय, दाखवतो तुम्‍हाला’ असा हा सत्‍ताधा-यांचा थाट आहे. वैशाली पाटील आणि कोकण बचाव समितीच्‍या इतर कार्यकर्त्‍यांवर जिल्‍हाबंदी घातलेली आहे. ज्‍या पोलिसांना आरडीएक्‍स पकडता येत नाही, ते कडक नाकाबंदी करून हे कार्यकर्ते येऊच शकणार नाहीत, अशी काळजी घेत आहेत. लोकांची अशी नीट मुस्‍कटदाबी करून वर आमचे बेशरम मुख्‍यमंत्री म्‍हणतात, की जैतापूरच्‍या लोकांचे गैरसमज अद्याप शिल्‍लक आहेत! वा चव्‍हाणसाहेब, जे लोक तुमच्‍या कोट्यावधी रूपयांच्‍या भरपाईवर पाणी सोडायला तयार आहेत, ज्‍यांनी आपली शेती, मच्‍छीमारी, इतर व्‍यवसाय, असे सर्वस्‍व पणाला लावले आहे, त्‍यांचे मत म्‍हणजे ‘गैरसमज’ आणि तुमचे मत म्‍हणजे ‘व्‍यापक राष्‍ट्रीय हित’ नाही का!

कालच केंद्र सरकारने म्‍हटले आहे, ‘जैतापूर प्रकल्‍प होणारच’. अरे वा, केवढा हा पुरूषार्थ! चार गावांमधले निशस्‍त्र शेतकरी आणि सामान्‍य नागरिक – आणि त्‍यांच्‍या विरोधात अख्‍ख्‍या देशाचे सरकार, राज्‍याचे सरकार, पोलिस, निमलष्‍करी दले… असे सगळेच. या नागरिकांचा पालापाचोळा काय… कसाही चिरडता येतो. नर्मदेचे पुनर्वसन करता करता 25 वर्षं जातात, आणि भोपाळमध्‍ये मेलेल्‍यांना तर 26 वर्षांनीही कवडीमोल न्‍याय मिळतो. परवा एनरॉन, आज जैतापूर… आधी झोडा, मग तुरूंगात टाका, मग आयुष्‍यातून उठवा… विरोध करणा-यांना असे एकेक करून चिरडून टाकले, की झालेच व्‍यापक राष्‍ट्रीय हित!

पण जैतापूरच्‍या लोकांप्रमाणेच माझाही एक गैरसमज आहे. तो असा आहे की, आपण एका लोकशाही देशात राहतो. आणि लोकशाहीत प्रत्‍येक नागरिकाच्‍या मताची किंमत सारखीच असते. लोकशाहीत लोकांना एखादी गोष्‍ट नको असेल आणि ते सनदशीर मार्गाने ती गोष्‍ट नको असे सांगत असतील, तर ती गोष्‍ट होता कामा नये. मग ती गोष्‍ट काही का असेना. जैतापूरच्‍या लोकांना त्‍यांची जमीन या प्रकल्‍पासाठी द्यायची नाही, बास् एवढेच कारण जैतापूर प्रकल्‍प रद्द करण्‍यासाठी पुरेसे आहे.

दुस-याने निर्णय घ्‍यायचे आणि तिस-याला बुडवायचे ही वसाहतवादी गुलामीची पध्‍दत आपण अजून वागवतो आहोत. 1894चा भूसंपादन कायदा आपण अजून तसाच ठेवला आहे. सरकारला वाट्टेल ती जमीन ताब्‍यात घेण्‍याचे निरंकुश अधिकार आहेत. ही वैधानिक दादागिरी ब्रिटीशांनी सुरू केली आणि आपल्‍या काळ्या ब्रिटीशांनी ती आपल्‍या सोयीसाठी चालू ठेवली. भाक्रानांगल धरण झाले, तेव्‍हा त्‍या धरणात बुडालेल्‍या ग्रामस्‍थांपुढे पं.नेहरूंनी मोठे भाषण दिले होते आणि ‘for greater common good’ म्‍हणजे व्‍यापक राष्‍ट्रीय हितासाठी तुम्‍ही हा त्‍याग केला पाहिजे असा डोस त्‍या नागवलेल्‍या लोकांना दिला होता. ज्‍यांच्‍याकडे काहीच नाही किंवा तुटपुंजे आहे, त्‍यांनी देशासाठी त्‍यागबिग करायचा आणि त्‍यांच्‍याकडून बळकावलेल्‍या जमिनी, पाणी, जंगले, खनिजे भांडवलदारांकडे सोपवायची. त्‍यांनी जमेल तितका कर बुडवून, नोकरशहा आणि सत्‍ताधा-यांची पोटे भरून, जमेल तितपत जीडीपी वाढवायचा – म्‍हणजेच ‘व्‍यापक राष्‍ट्रीय हित’! ही व्‍याख्‍या नेहरूकाकांपासून आजच्‍या सत्‍ताधा-यांपर्यंत सर्वांनी टिकवून धरली आहे.

आत्‍ताचे उदाहरण घेऊ. पुण्‍याजवळ येऊ घातलेल्‍या एका सेझला तिथल्‍या शेतक-यांनी निकराचा विरोध केला, स्‍थ‍ानिक राजकीय पक्षही आंदोलनाची market value लक्षात आल्‍यावर विरोधात उतरले… अखेर सरकारला नमावे लागले. त्‍यावेळी जाहीरपणे बोलताना महाराष्‍ट्राचे द्रष्‍टे आणि महान नेते शरद पवार म्‍हणाले, ‘आम्‍ही प्रकल्‍प मागे घेतो. पण शेतक-यांनी तिथे शेतीच केली पाहिजे, त्‍यांना या जमिनी आणखी कोणाला विकता येणार नाहीत’. अरेच्‍चा, पुणे जिल्‍ह्यातल्‍या सर्व जमिनी पवारांच्‍या तीर्थरूपांनी घेऊन ठेवल्‍या आहेत, हे आम्‍हाला माहीत नव्‍हते. तसे नसेल, तर या जमिनींचे काय करायचे हे शेतक-याला सांगणारे तुम्‍ही कोण? उदारीकरणाचे युग आहे म्‍हणे. परदेशी आणि देशी कंपन्‍यांना तुम्‍ही भसाभसा स्‍वस्‍तात सवलतीत जमिनी वाटू शकता, त्‍यांच्‍यासाठी तुम्‍ही उदार! आणि मुक्‍त बाजारपेठ असूनही शेतक-यांना बाजारभावाने त्‍यांना योग्‍य वाटेल त्‍या ग्राहकाला जमिनी विकण्‍याचा किंवा न विकण्‍याचा हक्‍क नाही? भूसंपादन कायद्याचा चाबूक वापरून कोणाच्‍या जमिनी खालसा करायच्‍या हे हक्‍क मूठभर सत्‍ताधारी लोकांच्‍या हातात आहेत. हे कसले उ.खा.जा. (उदारीकरण खाजगीकरण जागतिकीकरण)?

जैतापूरला वीज बनवून ती वीज कोणाला वापरायची आहे? ज्‍यांना विजेची गरज आहे, त्‍यांनी जमीन देणारा इच्‍छुक विक्रेता शोधावा. जो ओरडून ओरडून जमीन विकायची नाही, असे म्‍हणतोय, त्‍याचीच जमीन आम्‍ही घेणार ही जबरदस्‍ती कशाला?

परवा पुण्‍यातल्‍या एका मैत्रिणीने प्रश्‍न विचारला, “आमच्‍या सोसायटीत कचरा व्‍यवस्‍थापनासाठी गांडूळ खत खड्डा करायचा होता. खड्डा करायला सगळ्यांची परवानगी होती. पण खड्डा आमच्‍या इमारतीजवळ मात्र नको, असे सर्वांचे म्‍हणणे होते. जैतापूरप्रमाणे सर्वच जण आमच्‍याकडे हे नको, म्‍हणाले तर?” इथे मजा अशी आहे की, कचरा सोसायटीतले लोक करतात, पण तो निस्‍तरायची जबाबदारी त्‍यांना नको असते. जैतापूरची इथे तुलनाच होऊ शकत नाही. कारण त्‍यांनी अतिरिक्‍त विजेची गरज निर्माण केलेली नाही. ती गरज मोठ्या शहरांची आहे.

ज्‍येष्‍ठ परिसरशास्‍त्रज्ञ, राष्‍ट्रीय सल्‍लागार परिषदेचे सदस्‍य आणि केंद्र सरकारने नेमलेल्‍या Western Ghats Ecology Experts Panel चे अध्‍यक्ष प्रा. माधवराव गाडगीळ यांनी रत्‍नागिरी-सिंधुदर्ग जिल्‍ह्यांचे मूल्‍यमापन नुकतेच पूर्ण केले. सरकारला सादर केलेल्‍या अहवालात त्‍यांनी म्‍हटले आहे, ”

Regional imbalances in development have been a major bane of India’s development efforts. It is therefore appropriate to focus development of any region on its own inherent strengths and not sacrifice these to meeting requirements of other regions. So the focus of development of energy or mineral resources of Ratnagiri-Sindhudurg may, very appropriately be put on meeting their own requirements. The current energy requirements of these districts are 180 Megawatts megawatts a year, while the current production is 4,543 Megawatts (Koyna 2000 MW, RGPCL 2200 MW, Finolex 43 MW, JSW 300 MW and remaining 900 MW proposed within 2-3 Months) a year. So these districts are more than meeting their own requirements and contributing to the national pool. If Mumbai has huge requirements, one may reasonably propose that a giant coal based power plant be located on the Malabar Hill, which offers a topographical situation identical to the current site of Jindal plant. Such location will have the further huge advantage that the power will not have to be transmitted over huge distances, greatly reducing transmission losses, and the huge losses of horticultural production under power lines in the Ratnagiri-Sindhudurg districts.”

हेच आमचेही म्‍हणणे आहे. ज्‍यांना विजेची गरज आहे, त्‍यांनी त्‍यासाठी त्‍यागबिग करावा. मुंबईतली जमीन द्यावी, नाहीतर सोलर पॅनल, पवनचक्‍क्‍या यावर भागवावे. काही का करेनात, जैतापूर आणि इतर तीन गावं नष्‍ट करण्‍याचा अधिकार मंत्रालयात बसणा-या बुणग्‍यांना दिलाच कुणी?

अणुउर्जा बरी की वाईट वगैरे प्रश्‍न नंतर… लोकांना नको असलेल्‍या गोष्‍टी लादण्‍याचा माज आधी उतरवला पाहिजे. त्‍यासाठीच जैतापूरच्‍या प्रकल्‍पाला विरोध केला पाहिजे आणि विरोध करणा-यांची पाठराखण केली पाहिजे. आपण नागरिक म्‍हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे की जैतापूरचे लोक जात्‍यात आहेत, अन् आपण सुपात आहोत. सत्‍ताधा-यांचा मद आणि उर्जेचा हव्‍यास आहे, तोवर कधीही आपल्‍या गावाचा नंबर लागू शकतो. आणि सत्‍ताधारी यंत्रणेलाही हे समजून घ्‍यावेच लागेल, की अत्‍याचारांचा अतिरेक आणि लोकशाही रस्‍त्‍यांची नाकेबंदी झाली की नक्षलवाद वाढतो! आज जैतापूरमध्‍ये दगडफेकीवर निभावले आहे, पुढे कुठे जाईल हे ‘कर्तृत्‍ववान’ मंत्र्यांच्‍याही हातात असणार नाही.

Monday, April 18, 2011

कारण नुसती लोकशाही आता पुरेशी नाही-विनय सहस्रबुद्धे

कारण नुसती लोकशाही आता पुरेशी नाही...!
विनय सहस्रबुद्धे
vinays57@gmail.com
रविवार, १७ एप्रिल २०११
भारताच्या विश्वचषक विजयानंतरचा संपूर्ण आठवडा अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आठवडा म्हणून जगभर गाजला. अण्णा हजारेंच्या आंदोलनाने नेमके काय साधले याचा आढावा घेताना या आंदोलनाच्या मर्यादांची चर्चा होणे अटळ आहे. पण मर्यादांची चर्चा करण्याच्या नादात अण्णांनी जे साधले त्याचे महत्त्व कमी लेखण्याची चूक करता कामा नये.
अण्णांच्या उपोषणाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे या आंदोलनामुळे बिगर राजकीय संघटनांच्या माध्यमातूनही जनतेच्या भावनांना समर्थपणे साद घालून एखादा विषय ऐरणीवर आणला जाऊ शकतो ही गोष्ट सिद्ध झाली. एरवी सिनिक झालेल्या चंगळवाद्यांपासून ते थकून निपचित पडलेल्या अ‍ॅक्टिव्हिस्टांपर्यंत आणि वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांपासून नवतरुण ‘की-बोर्ड वॉरियर्स’पर्यंत सर्वाना अण्णांचे आवाहन साद घालून गेले, ही गोष्ट सध्याच्या वातावरणात आशेचा प्रखर किरण म्हणण्यासारखी आहे. फॅशनेबल एन.जी.ओ.वाले मेणबत्त्या घेऊन कृत्रिमपणे चालतात तेव्हा सामान्यत: त्यांच्या स्वत:च्या चेहऱ्यांशिवाय फारसे काही उजळत नाही. पण परवाच्या आंदोलनात मेणबत्त्या घेऊन जाणारा तरुण आपल्या संपूर्ण पिढीलाच ‘अंधेरे में एक प्रकाश’ सापडल्याच्या श्रद्धेने सहभागी झाल्याचे जाणवत होते. आवाहनाची ताकद, आवाहनाची व्याप्ती, प्रतिसादातील सच्चेपणा, सर्वसमावेशकता आणि मुख्य म्हणजे त्यामधील उत्स्फूर्तता ही सर्व अण्णांच्या आंदोलनातील उल्लेखनीय वैशिष्टय़े म्हणायला हवीत. मुख्य म्हणजे उत्स्फूर्ततेचा भावनिकतेशी सख्खा संबंध असूनसुद्धा जंतरमंतरला एकत्र झालेला समुदाय एखाद्या निखळ भावनिक विषयाने भारलेल्या जमावासारखा नव्हता. त्यात भावनिकता होतीच, पण ‘देशात जे चाललंय त्यात बदल हवा आहे आणि आपणही त्या बदलाला गती देऊ शकतो,’ अशी एक वैचारिक जाणही होती.
अण्णा हजारे हा काहीसा भक्तिमार्गी माणूस. मंदिर, प्रवचन, कीर्तन यांच्या माध्यमातून जनमानस घडविण्याचे काम त्यांनी राळेगणसिद्धीत याआधीही केले आहे. त्यामुळेच त्यांनी भारतमातेच्या चित्राचा पाश्र्वफलक असलेल्या व्यासपीठावरून आंदोलकांशी संवाद साधावा यात तसे आश्चर्यकारक काही नव्हते, पण भारतमातेच्या चित्राचे वा वंदेमातरम् घोषणेचे वावडे असणाऱ्यांना त्यांनी आपली चळवळ हायजॅक करू दिली नाही, हेही एक वैशिष्टय़च! थँक्स टू अण्णा हजारे. भारतमातेला सलग चार-पाच दिवस लाइम-लाइट मिळाला ही भारतातल्या बहुचर्चित (आणि हिंदुत्ववाद्यांनी न चालविलेल्या) आंदोलनांच्या इतिहासातील वैशिष्टय़पूर्ण बाब म्हणायला हवी.
शुद्ध हेतूने काही तरी पणाला लावून मैदानात उतरलेले नेतृत्व आणि त्याने व्यापक जनअसंतोषाला घातलेली समर्थ साद व ऐन निवडणुकीच्या प्रचार काळात त्यामुळे निर्माण झालेला जन-दबाव हे सारे घटक जुळून आले होते, त्याला निर्णायक विजयापर्यंत खेचून नेले ते मात्र प्रसारमाध्यमांनी. प्रसारमाध्यमांनी ठरविले असते तर हे आंदोलन इतक्या त्वरेने देशव्यापी न बनते आणि त्यातून सरकारवर दडपणही न येते. त्यामुळेच या आंदोलनाने विश्वसनीयता गमावू लागलेल्या माध्यमविश्वाची ताकद जशी प्रकर्षांने पुढे आली तशीच स्पर्धात्मक पक्षीय राजकारणाची मर्यादाही अधोरेखित झाली. लोकशाही राजकारणात स्पर्धा अपरिहार्य आहेच. पण स्पर्धात्मकतेचा अतिरेक झाल्यावर लोकशाही प्रक्रियाच पोकळ बनते आणि प्रक्रियेतील घटकसंदर्भ हरवून बसण्याच्या धोक्यात येतात हे वास्तवही अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने ठळकपणे पुढे आले आहे.
अण्णांच्या आंदोलनातून काही सकारात्मक आणि काही निखळ वास्तवदर्शी अशा बाबी जशा पुढे आल्या, तशाच या विषयाच्या आणि आंदोलनशैलीच्या मर्यादाही लख्खपणे पुढे आल्या आहेत. आपल्या आंदोलनाला एवढा प्रतिसाद मिळेल हे हजारे-केजरीवाल यांच्या कल्पनेतही नसेल. त्यामुळेच भ्रष्टाचाराच्या विरोधातील तीव्र आणि व्यापक असंतोषाला वाट करून देणाऱ्या या आंदोलनाचा ‘फोकस’ लोकपाल विधेयकापुरताच सीमित ठेवला गेला. इतक्या उस्फूर्त, अस्सल आणि व्यापक जनप्रतिसादातून बळकट झालेले हे आंदोलन लोकपाल विधेयकाच्या भवितव्यानुसार यशस्वी झाले की अयशस्वी हे ठरविले जाईल व ते जनसमर्थनाच्या उंचीलाच खुजे करणारे ठरेल. अण्णा हजारे हे समर्थ संघटक असतील आणि वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी देशात सर्वत्र फिरून संघटनेचे मजबूत व टिकाऊ नेटवर्क उभे करण्यात त्यांना यश मिळाले तर कदाचित हे अजूनही घडू शकेल. पण पूर्वेतिहास पाहता हे संभवनीय वाटत नाही. शिवाय अण्णा आणि त्यांचे आत्ताचे सर्व साथीदार अनेक महिने एकत्र राहून एकदिलाने लढतील याची खात्री देणेही अंमळ अवघडच! अशा स्थितीत जनलोकपाल विधेयकाचा आपला मसुदा काही तडजोडींसहसुद्धा अण्णा हजारे आणि त्यांचे सहयोगी आधी मंत्रिमंडळाकडून व मग संसदेकडून मान्य करून घेऊ शकतील हे आज तरी विलक्षण अवघड वाटते.
सध्या स्थगित झालेले अण्णांचे आंदोलन १५ ऑगस्टनंतर कदाचित पुनरुज्जीवित होईलही. तसे करताना निवडणूक सुधारणांसह व्यापक राजकीय सुधारणांपर्यंत आंदोलनाची व्याप्ती वाढविली तरच उद्याच्या पिढीला आग्रहाने हवी असलेली स्वच्छ पण कार्यक्षम लोकतांत्रिक राज्यव्यवस्था अस्तित्वात येऊ शकेल. सध्याच्या लोकतांत्रिक राजकारणाचा एक ‘साचा’ झाला आहे. पक्षोपपक्षांना याच साच्यातून बाहेर पडलेले लोकप्रतिनिधी मिळतात आणि या प्रक्रियेत तो साचाच बळकट होत राहतो. हा ‘साचा’ बदलायचा असेल तर नुसत्या निवडणूक सुधारणा पुरेशा नाहीत. त्यासाठी राजकीय पक्ष हे फॅमिली प्रॉपर्टीसारखे चालविण्याची पद्धत मोडून काढावी लागेल. राजकीय पक्ष हे निवडणुकींना सामोरे जातात, त्यामुळे (जनादेश वगैरे न मिळताही काम करणाऱ्या) एन.जी.ओ.वाल्यांपेक्षा आपण अधिक लोकाभिमुख असल्याचा दावा अनेक राजकीय नेते करतात. पण लोकप्रियता म्हणजे लोकाभिमुखता नव्हे आणि नुसते लोकाभिमुख राहण्याने लोकहित साधले जाते हेही खरे नव्हे! शिवाय, लोकशाही ही निवडणूकशाहीपेक्षा कितीतरी उदात्त आणि व्यापक संकल्पना आहे. स्वयंसेवी संस्थांना सरकारी निधीसाठी सुपात्र मानताना रक्ताच्या नात्यातील दोन जण (वा अधिक) संस्थेच्या विश्वस्तांमध्ये नसावेत असा नियम करणारी सरकारे चालविणारे राजकीय पक्ष मात्र घराणेशाहीवर चालावेत याइतका आणखी पराकोटीचा विरोधाभास नसेल!
त्यामुळेच मध्य पूर्वेतील निम-लोकतांत्रिक वा निखळ हुकूमशाही राजवटींना उलथवून लावण्याची ताकद असलेल्या आंदोलनांच्या पाश्र्वभूमीवर आपल्या देशात घडून गेलेल्या या आंदोलनाचा इशारा आहे तो आपल्या लोकशाहीच्या विकृत अंमलबजावणीला! संसदेच्या सार्वभौमत्वाबद्दल लांबलचक भाषण ठोकणारे विधिमंडळांच्या व संसदेच्या कामकाजाच्या वाढत्या अनुत्पादकतेबद्दल काहीच करताना का दिसू नयेत? झालेल्या मतदानापैकी अवघी २०% मते मिळवून विजयी होणारे- विरोधी मतांचे विभाजन घडवून आणण्यातील वाकबगार- उमेदवार ‘जनादेश’ वगैरे ताकदीचे शब्द वापरतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेचा पोकळपणा लक्षात न येण्याइतके सर्वसामान्य लोक दुधखुळे आहेत असेच त्यांना वाटते काय? राजकीय नेत्यांनी जनतेला गृहीत धरण्याची चूक करू नये तशी अण्णांच्या सैनिकांनी संपूर्ण राजकीय पक्ष-व्यवस्थेला कस्पटासमान लेखण्याची घोडचूकही अजिबातच करता कामा नये.
सारांशाने काय, तर अण्णांच्या मागे ताकदीने व उत्साहाने, उत्स्फूर्ततेने उभ्या राहिलेल्या तरुणाईचा (पुन्हा) भ्रमनिरास व्हायचा नसेल तर अण्णांना व त्यांच्या सहकाऱ्यांना व्यापक राजकीय सुधारणांच्या दिशेने आंदोलनाचा रोख वळवावा लागेल. लोकांना आता नुसती लोकशाही पुरेशी वाटत नाही. त्यांना हवी आहे परिणामाभिमुख लोकशाही! पण त्यासाठी आंदोलनाच्या नेतृत्वाला आपली लक्ष्ये पुनव्र्याख्यित करावी लागतील. लोकशाहीने ज्यांची तहान भागत नाही त्यांना परिणामशून्य लोकआंदोलन आणखी अस्वस्थ करेल. बेसावधक्षणी, पेटत्या मेणबत्तीच्या गळणाऱ्या मेणाचा चटका बसून मेणबत्ती-मार्चमधील एखाद्याने मेणबत्ती भिरकावून दिली तर वणवा भडकायला तेवढीही पुरेशी आहे, याचे भान सर्वानाच ठेवावे लागेल. मेणबत्तीवाल्यांनाही आणि त्यांना कमी लेखणाऱ्यांनाही!
Courtesy:(लोकसत्ता, रविवार दिनांक १७ एप्रिल, २०११)

Friday, April 8, 2011

Anna Hazare: NGOs for Governance? Sandhya Jain

Sandhya Jain
7 April 2011

In the wake of an orchestrated frenzy to achieve a particular legal structure against official corruption, it is pertinent to ask all political parties if they are willing to abolish Parliament and representative government, and entrust power to a coterie of NGOs with overt and covert Western support.

Anna Hazare’s gigantic exercise to delegitimise the elected UPA and elected Members of Parliament, and insist that a self-appointed group of moral guardians shall determine the contours of a proposed national legislation to tackle corruption in government, is an assault on the letter and spirit of the Constitution. Unelected crusaders with agendas derived from unknown sources; and ample funds to whip up moderate street participation; can at best be regarded as a pressure group with a right to be heard.

Anna Hazare’s so-called fast-unto-death is questionable for its anti-democratic disdain for elected government and people’s representatives. The timing is equally suspect – right after the adjournment of Parliament after passing the Union Budget. It may be recalled that Prime Minister Manmohan Singh was forced to gift Rs. 40,000/- crores to the leaky MREGA project favoured by Congress president Sonia Gandhi and her unelected friends in the National Advisory Council; his attempts to curtail this hole in the exchequer enraged her.

As if on cue, Hazare, NAC cronies, Rockefeller Foundation-funded Magsaysay Award winners, and other usual suspects, ganged up against the besieged prime minister. Concerned citizens and analysts have a duty to ask whether the government of a Republic that derives its power from the people should – in the months preceding the monsoon session of Parliament – cave in to blackmail by well-heeled and well-connected NGOs, and accept a legislation drafted by them? If laws are to be adopted and enacted in this manner, do we need either government or Parliament?

We may as well formally declare India a ‘Mandate’ of the United States. After all, the NAC that rules the government is chaired by ‘Indo-US nuclear deal is close to my heart’ Sonia Gandhi, and includes French national Jean Dreze, besides ex-IAS officer Harsh Mander, who became internationally famous by maligning the nation in the wake of the post-Godhra riots.

By an interesting coincidence, the attack of the NGO Armada coincides with the Supreme Court’s smashing the moral credentials of Medha Patkar and her Narmada Bachao Andolan (NBA), for filing a false affidavit in the matter of the Omkareshwar Dam project. A Bench of
Justices JM Panchal, Deepak Verma and BS Chauhan – annoyed at the NGO’s false claim that the State of Madhya Pradesh had wrongfully acquired 284 hectares of land from Indore farmers – asked it to explain “why it should not be restricted from filing any case/petition before any court throughout the country”. Why indeed.

More pertinently, State Government counsel informed the Court that Patkar’s NGO is not a registered society and is thus not even entitled to represent the oustees! Surely that sums it up – NGOs are only a ‘lobby’; they are not equal to, much less above, elected representatives of the people. Yet the fact that Patkar’s Narmada Bachao Andolan could exist and enjoy high profile for 30 long years without complying with any legal formalities, proves that such NGOs are intricately networked with the Congress-dominated political and bureaucratic hierarchy, despite pretensions of ‘dissent’ and leadership of the ‘voiceless’. There can be no doubt that they have a hidden agenda.

Now that the Supreme Court has taken cognizance of the dubious credentials of this NGO, it must direct the State Government to investigate the sources of its funding, and possible agenda.

To return to Anna Hazare, the aged war-horse has been seriously undermined by Karnataka Lokayukta Justice N. Santosh Hegde, whose name has been recklessly used over the past few weeks to garner middle class support for the private Jan Lokpal Bill drafted by Hazare, Hegde and others. Hedge has suggested that Hazare’s decision to fast until the Centre agrees to pass this Bill is premature, as the National Advisory Council is still discussing this private Bill and has not given its recommendations to the government.

Justice Hegde has indirectly admitted that there are differences of opinion regarding various clauses of the Bill even among the activists who drafted it. This suggests that the NAC may moot new clauses that could divide the activists further. With the private Bill thus likely to be subjected to further changes by the NAC, Hazare’s fast makes little sense to even some of his colleagues. It would seem that its purpose is to coerce Dr Manmohan Singh to commit to whatever Sonia Gandhi dishes out in the name of the NAC, despite institutional reservations from government. This is extra-constitutionalism at its zenith – strange that the opposition BJP should be so blind to it.

Certainly there is something inexplicable in Hazare’s haste – “It’s a fight to the finish for citizen’s rights”. Why? What is the hidden target he is hurtling towards; why is it secret from the rest of us?

Readers who may regard this critique as harsh should consider that Anna Hazare wants a joint committee comprising government and civil society leaders [read individuals and NGOs favoured by him and his friends] to rework the current draft Lokpal Bill. I am refraining, in this article, from going into the merits of his critique of the Government Draft [I stipulate there will be much merit in it]; in fact, I am not going into the text of his draft at all, nor comparing it with the impugned Government draft.

My point is that he is instigating the middle class intelligentsia that comes to hear him at Jantar Mantar – and neither he nor any of his allies is a grassroots mass leader – to despise and distrust politicians and bureaucrats as a class when these are the constitutional pillars of State. In their place, Hazare moots an unelected oligarchy. This does not bode well for the nation or the society.

While he is within his rights to fiercely criticise the Government draft Lokpal Bill, it is utterly unworthy to say that, “If the government alone drafts the anti-corruption bill, it will be autocratic not democratic, there will be discrepancies.” Here it may be pertinent to note that while Hazare’s charmed inner circle includes some high profile lawyers who have made a mark in the battle against corruption in high places, he has placed NO FAITH in the Judiciary as an institution in rectifying anomalies in the law and its application, and in bringing culprits to justice. This is a strange kind of crusade.

A major plank to justify the hunger strike is the string of scams that have hit the UPA-II, most notably the 2G Spectrum Scam and the scandals associated with the Commonwealth Games.

Yet the 2G Spectrum Scam probe is being closely supervised by the Supreme Court and the principal accused are already in jail – without help from Hazare or his associates.

On the Commonwealth Games – Hazare & Co. are conspicuous by their silence on the Report of the V.K. Shunglu Committee which has nailed Delhi Chief Minister Sheila Dikshit, Lt. Governor Tejinder Khanna, and the Central Ministries associated with the Games for all the sins of omission and commission. The shameless manner in which Mrs Dikshit has sought to ridicule the Shunglu Committee, her meeting to garner the support of Ms Sonia Gandhi, the failure of Sonia Gandhi and Congress to move against Dikshit, all speak eloquently about who shields corruption in the UPA.

I would have had faith in the Anna Hazare fast if he had made action on the Shunglu Committee the pivot of his crusade and fast in Delhi, and not made the personally honest Prime Minister the target of his rage. The fact that this very live issue of high level corruption in the capital – which still reverberates in world capitals – did not even occur to him or his associates should be evidence enough of an unspoken agenda and an illegitimate target. It reminds one of Sherlock Holmes’ quintessential query – but why didn’t the dog bark?

In conclusion, I must say I cannot agree with the main object of Anna Hazare’s fast –to elevate a select coterie as national super cop and super judge, as a national daily put it so aptly.

I robustly condemn the idea that Magsaysay Award-winning Indians should figure in the Lokpal selection panel. This stinks of an American hand. Without casting aspersions on any individual, it bears stating that the Magsaysay Award is funded by the Rockefeller Foundation, though it is named after late Philippine leader Ramon Magsaysay.

As the Rockefeller family has vast business interests all over the globe and doubtless also in India, we shall never know what kind of private networking could take place in government and bureaucracy via its favoured persons, to further Rockefeller interests. Recently we saw US insurance corporate-cum-philanthropist Warren Buffet visiting India and Government pushing to raise FDI in insurance from 26% to 51%! Bill and Melinda Gates were also here – peddling vaccines of unknown quality and of course the detestable GM seeds.

India’s high profile elites derive status from the international NGO cocktail circuit. Their insatiable quest for funds and glory makes them adopt ideas and concepts without examining their validity in an Indian context. As they are very conscious of their elite status, they have unacceptable contempt for the people and their elected representatives. We cannot endorse these non-accountable and glittering Western satellites.

Add to Google