Thursday, August 30, 2018

डाव्यांच्या "सहस्रसुर्यदर्शन" सोहळ्याची ही सुरुवात आहे

--- विनय जोशी 

Image may contain: 1 personराजदीपचा "सहस्रसुर्यदर्शन" सोहळा पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात आहे. एक वकील आणि काही लोक त्याची तयारी गेली कित्येक दिवस करत आहेत.

परवा झालेला "सहस्रसुर्यदर्शन" कार्यक्रम एवढा परिणामकारक आहे की वारावारा राव सारखे बेफिकीर लोक सुद्धा मुळापासून हलले. ज्याची स्वप्नातसुद्धा कल्पना केलेली नसेल ते प्रत्यक्षात झालं की असं होणारंच!
तुषारच्या कालच्या लाइव्ह मुलाखतीच्या वेळी राजदीपच्या डोळ्यातून नेहमी उतून वाहणारा माज, घमेंड, नसलेल्या ज्ञानाची मस्ती, अहंकार, समोरचा कोणीतरी फालतू 'अनपढ', 'गवार' आहे हे सर्व भाव गायब होते आणि त्या सगळ्याची जागा 'चिंता', 'भिती','असुरक्षितता','वेदना','अनिश्चितता' या शुद्र मानवांना सतावणाऱ्या भावनांनी घेतली होती.
राजदीप आणि त्याची बायको गेल्या १५ वर्षात इतक्या वेळेला खोटं बोलले आहेत की आता लोक मोजायचे बंद झाले. अहंकार तर असा की हा 'बृहस्पती' चा साक्षात अवतार आहे आणि ह्याला जगातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. हा म्हणेल ती पुर्व दिशा आणि हा म्हणेल तेच खरं. 
पण कायदेशीर नोटीस बसली आणि त्याच्या मालकांनी माफी मागायचे आदेश दिले की दोन पायात शेपुट घालुन पाळायला तयार (https://www.youtube.com/watch?v=h6nHt2hT_-8 )

पुढच्या महिन्यात राजदीपच्या मित्रांनी जो "सहस्रसुर्यदर्शन" कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांनी समस्त पुरोगामी घंटुराम जी आगपाखड करतील ती बघायला जाम मजा येईल. अनेक वेळा खोटं बोलूनही हा मनुष्य इतका माजात कसा काय राहू शकतो हेच एक मोठं कोडं आहे. 
याची बायको आणि हा दोघांचे पुर्ण ३६ गुण जुळतात हे त्यांनी अनेक वेळा सिद्ध केलं आहे. त्या सोहळ्यात राजदीपच्या सौं-चं नाव आहे की नाही कल्पना नाही, पण असुही शकतं!

असे अनेक "सहस्रसुर्यदर्शन" २०१९ च्या लोकासभेपुर्वी झाले तर परिस्थिती आटोक्यात राहील. ज्यांनी कोरेगाव-भीमा भडकवलं ते सगळे सध्या एका मोठ्या मानसिक धक्क्यातुन जात आहेत. धाडी पडुन ४८ तास झाले तरी प्रकाश आंबेडकर नेहमीच्या आवेशात कुठेही दिसत नाहीत. तेलतुंबडेच्या गोव्यातल्या घरावर छापा पडल्याने ज्यांना जे कळायला पाहिजे ते कळलं आहे.

प्रशांत भुषण आणि कंपनी एका अनामिक भीतीने वेडे झाले आहेत. आधीच्या आयुष्यात जी जी पापं केली आहेत त्या पापांचे एफ.आय.आर. मध्ये कोणत्याही क्षणी कन्वर्जन होऊ शकतं ही भीती अतिशय मोठी आहे. अटकेच्या वेळी वारा वारा राव त्याच्या घरी उपस्थित त्याच्या एका मित्राला म्हणाला, '१९७५ च्या आणीबाणीच्या नंतर माझ्या घरात पाय ठेवायची हिम्मत आजपर्यंत कुणी केली नव्हती, पण आज महाराष्ट्र पोलीस थेट इथे पोचलेत". 
त्याचा सगळा 'रुतबा', 'ऐट' आणि 'करिष्मा' कचऱ्याच्या टोपलीत टाकुन महाराष्ट्र पोलीस त्याचं बोचकं बांधुन महाराष्ट्रात घेऊन आलेच! आणि यापुढचा मामलाही सोपा नाही, UAPA च्या कलमांखाली हे अटकसत्र आहे. कोणत्याही कोर्टाला जामिनाची सुनावणी करताना हजारवेळा विचार करावा लागेल.

डावे कालपर्यंत भारताचे अनभिषिक्त सम्राट असल्याच्या मस्तीत वावरत होते, ती सगळी मस्ती एका फटक्यात मोडली... याच निराशेतून एका कफल्लक कुसंस्कृत माणसाने टीव्हीवर तुषार दामगुडेला "कुत्रा" म्हटलं! समोर काय वाढून ठेवलंय याची चाहुल लागली की जीभ बेकाबु होणारंच!

भविष्यातील अशा अनेक "सहस्रसुर्यदर्शन" कार्यक्रमांना पोलिसांना खूप खूप शुभेच्छा! 







Add to Google