Tuesday, August 28, 2018

बलात्कारगृहे, लैंगिक अत्याचार माफीनामा आणि अमेरिकन कार्डीनलचा लैंगिक महाघोटाळा- कॅथोलिक चर्च अभुतपूर्व संकटात

बलात्कारगृहे, लैंगिक अत्याचार माफीनामा आणि अमेरिकन कार्डीनलचा लैंगिक महाघोटाळा- कॅथोलिक चर्च अभुतपूर्व संकटात 

---  विनय जोशी 

पोपच्या आयर्लंड दौऱ्यात झालेली निदर्शने आणि वॅटिकनच्या अमेरिकेतील माजी राजदूत आर्चबिशप कार्लो मारिया विगानो यांनी पोपवर गंभीर आरोप करून पोपच्या राजीनाम्याची मागणी केल्याने कॅथोलिक चर्च अभूतपूर्व संकटात.

"मॅग्दालीन लाउंड्रीज" मधील महिलांची आणि अविवाहित गरोदर महिलांची 'महिला आणि बालगृहे' यात जन्माला मुले यांना बळजबरीने हिसकावून घेऊन यांना अज्ञात लोकांना विकणे आणि दत्तक देणे; बिशप, फादर्स आणि चर्च नेतृत्वाने आपल्या अधिकारांचा वापर करून चर्च नियंत्रित शाळा, होस्टेल, धार्मिक संस्थाने यातील लहान मुले आणि महिलांवर लैंगिक अत्याचार करणे अशा अनेक कारणांमुळे कारणांबद्दल पोप फ्रान्सिस यांनी आयरिश लोकांची जाहीर माफी मागितली.  पण वर्षानुवर्षे "मॅग्दालीन लाउंड्रीज" संपुर्ण आयुष्य सडलेल्या, "मॅग्दालीन लाउंड्रीज" च्या भिंतींच्या मागे अनन्वित लैंगिक आणि मानसिक अत्याचार झालेल्या हजारो पीडित महिलांना आर्थिक नुकसाभरपाई देण्याच्या मागणीवर पोपने सूचक मौन पाळले.

पुर्वी पोपच्या आयर्लंड दौऱ्याच्या वेळी प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसत होते ते यावेळी कर्फ्यू सदृश परिस्थिती डब्लिनच्या रस्त्यांवर दिसून आली. 

कार्डीनल थियोडोर मॅककॅरिकचे भयंकर अत्याचार!
कार्डीनल थियोडोर मॅककॅरिक या अमेरिकन कॅथोलिक कॅथोलिक नेत्याने त्याच्या आयुष्यात चर्चमध्ये येणारे भाविक ख्रिश्चन, त्यांच्या बायका, मुले, एवढंच नाही तर चर्चमधील त्याच्या हाताखाली काम करणारे ब्रदर्स, फादर्स, बिशप मिळेल त्या माणसाचा शारीरिक उपभोग घेतला. ही सर्व पापे त्यावेळचे वॅटिकनचे  अमेरिकेतील राजदूत आर्चबिशप कार्लो मारिया विगानो यांनी पोप फ्रान्सिसच्या कानावर घातली, परंतु पोपने याकडे साफ दुर्लक्ष करून लिंगपिसाट कार्डीनलच्या पापांवर पांघरूण घालण्यात पुढाकार घेतला. आणि हा आरोप खुद्द आर्चबिशप कार्लो मारिया विगानो  यांनीच केला आहे.
शेवटी ५ वर्षे दुर्लक्ष केल्यानंतर कार्डीनल थियोडोर मॅककॅरिकचा राजीनामा घेण्यात आला.

कॅथोलिक चर्च जगात सर्वत्र अध्यात्मिकतेचा बुरखा घालुन भयंकर पापे करत आलेले आहे. आता फरक एवढाच आहे की सामान्य कॅथोलिक ख्रिश्चन चर्चमधल्या भयंकर नैतिक आणि आर्थिक पापांमुळे पूर्णपणे उबला आहे.

आम्ही भारतीयच अजून तरी कॅथोलिक चर्चला शांतीदूत मानत आहोत. पण सध्या भारतभरात कॅथोलीकांनी विकलेली अर्भके, फादर्सनी  केलेले सामुहिक बलात्कार, कॅथोलीकांनी हडपलेल्या हजारो एकर जमिनी, खाल्लेले पैसे यामुळे भारतीय समाज आणि भारतीय कॅथोलिक कम्युनिटी लवकरच चर्चच्या मायाजाळातून बाहेर आलेली बघायला मिळेल अशी भोळी अपेक्षा आहे!







Add to Google