Tuesday, March 21, 2017

मुग्धा कर्णिक आणि दिव्य मराठी संपादकाविरोधात दापोली पोलिसात FIR दाखल

मुग्धा कर्णिक आणि दिव्य मराठी संपादकाविरोधात दापोली पोलिसात FIR दाखल.

मुर्डी- आंजर्ले (ता. दापोली) येथील RTI कार्यकर्ते श्री. आदित्य पेंडसे यांनी आज दापोली पोलिसात मुंबई विद्यापीठातील प्राध्यापक मुग्धा कर्णिक आणि मराठी दैनिक दिव्य मराठीचे संपादक यांच्याविरोधात संघ आणि संबंधित संघटनांविरोधात गलिच्छ आणि बदनामीकारक आरोप लावल्याबद्दल तक्रार दाखल केली. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०५(१) B, ५०५(१) C,५०५ (३) आणि IT Act- 2000 ज्याला सायबर क्राईम कायदा म्हणतात, यांच्या अंतर्गत दापोली पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले.
दापोली पोलीस सदर प्रकरणाचा तपास वेगाने करत असून दोन्ही संबंधिताना या प्रकरणात कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.